Home Breaking News जुगार अड्डा चालकाचा अल्पवयीन आरोपींनी केला खून

जुगार अड्डा चालकाचा अल्पवयीन आरोपींनी केला खून

0
जुगार अड्डा चालकाचा अल्पवयीन आरोपींनी केला खून

जुगार अड्डा चालकाचा अल्पवयीन आरोपींनी केला खून

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : दोन अल्पवयीन आरोपींनी कुख्यात गुंडाचा क्षुल्लक कारणावरून तलवार आणि चाकूने भोसकून खून केल्याची घटना रविवारी ९.३0 वाजताच्या सुमारास पाचपावली हद्दीतील नाईक तलाव बांग्लादेश हनुमान मंदिराजवळ घडली. इंद्रजित ऊर्फ इंदल विक्रम बेलपारधी (३५) रा. वैशालीनगर, पंचकुला असे मृताचे नाव आहे.
इंद्रजित बेलपारधी हा कुख्यात अपराधी आहे. त्याच्यावर खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तो परिसरात जुगार अड्डा चालवायचा. त्याच्यावर १८ गुन्हे दाखल आहेत. आठ दिवसांआधी इंद्रजितच्या गाडीचा दोन अल्पवयीन मुलांच्या गाडीला कट लागला. त्यावेळी त्यांच्यात चांगलाच वाद झाला होता. तेव्हापासून अल्पवयीन आरोपी इंद्रजितचा गेम करण्याच्या तयारीत होते. त्याचा गेम करण्यासाठी ते संधी शोधतच होते. वाद मिटविण्यासाठी दोन्ही अल्पवयीन आरोपींनी इंद्रजितला रविवारी (ता.२५) रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास पाचपावली हद्दीत नाईक तलाव, बांग्लादेश, हनुमान मंदिराजवळ बोलविले. दरम्यान, इंद्रजित त्यांना येताना दिसला. तो आपल्याला मारायलाच येत आहे, असा समज त्यांना झाला. ते आधीच इंद्रजितचा गेम करण्याच्या तयारीतच होते. अल्पवयीन आरोपी स्वत:जवळ चाकू आणि तलवार बाळगत होते. इंद्रजित दिसताच त्यांनी त्याच्यावर लगेच चाकू आणि तलवारीने वार करणे सुरू केले. आरोपींनी इंद्रजितच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर तलवार आणि चाकूने वार केला. इंद्रजितवर वार होताना पाहून लोक त्याला वाचविण्यासाठी आले. हे पाहताच आरोपींनी पळ काढला. परिसरातील लोकांनी इंद्रजितला मेयो हॉस्पिटल येथे नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पाचपावली पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पाचपावली पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.