राज्याला मोठा दिलासा! आज ७१ हजार रुग्ण कोरोनामुक्त, ४८ हजार नव्या रुग्णांची नोंद

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8496*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

246

राज्याला मोठा दिलासा! आज ७१ हजार रुग्ण कोरोनामुक्त, ४८ हजार नव्या रुग्णांची नोंद

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,मुंबई – राज्यात कोरोनाची परिस्थिती विदारक बनत असताना आज अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत ४८ हजार ७०० नव्या  रुग्णांची वाढ झाली आहे. तर, तब्बल ७१ हजार ७३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्याकाही दिवसांपासून राज्यातून सतत नकारात्मक बातम्या येत असताना ही सकारात्मक बातमी समोर आल्याने येत्या दिवसांत परिस्थिती आणखी सुधारेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

आतापर्यंत एकूण 36 लाख 01 हजार 796 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.92 टक्के  झाले आहे. राज्यात एकूण 36 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज एकूण 524 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.05 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 65 हजार 284 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 524 मृत्यूंपैकी 293 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 116 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 115मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.

मुंबई गेल्या 24 तासात 3840 कोरोना बाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 3840 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. . आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 44 हजार 958 वर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 86 टक्के आहे. सध्या 70 हजार 373 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर 62 दिवस आहे.

1 मे नंतर वयोगटानुसार लसीकरणावर सरकारचा भर 

18 ते 25 वयोगटात, 26 ते 35 वयोगट आणि 36 ते पुढील वयोगटातल्या लोकांना लसीकरण करता येण्याची शक्यता आहे.  त्यानंतर सध्या रजिस्ट्रेशनची जी पद्धत सुरु आहे तीच पद्धत ठेऊन जेवढ्या लस उपलब्ध आहेत. तेवढंच रजिट्रेशन झालेल्या नागरिकांना लस दिली जाईल. सध्या सगळ्यांकडे आरोग्य सेतू ॲप उपलब्ध आहे. त्या ॲपच्या माध्यमातून लसीकरण करता येईल का यावर देखील विचार सुरू आहे. मुंबईत वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरु होत आहेत. त्यामुळे जिल्हापातळीवर देखील असा उपक्रम राबवण्यावर भर आहे. सध्या इंजेक्शन, ऑक्सिजन आणि बेड्सचा तुटवडा असताना राज्यात लावलेला लॉकडाऊन या सर्व परिस्थितीत लसीकरणावर राज्य सरकारला भर द्यायचा आहे.