Home Breaking News ठाणे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, अकोल्याच्या पोलीस निरिक्षकांचा...

ठाणे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, अकोल्याच्या पोलीस निरिक्षकांचा परमबीर सिंहांवर आरोप

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8491*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

48 views
0

ठाणे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, अकोल्याच्या पोलीस निरिक्षकांचा परमबीर सिंहांवर आरोप

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खंडणी मागितल्याचा आरोप करणारे परमबीर सिंग यांच्यावरही आता भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. अकोल्याचे पोलीस निरीक्षक पदावरील एका अधिकाऱ्याने याबाबतचे गंभीर आरोप केले आहेत. या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना त्यासंदर्भात पत्रही पाठवलं आहे. संबंधित वृत्त पीटीआयच्या हवाल्याने समोर आलं आहे. दरम्यान, अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्याच्या या नव्या लेटरबॉम्बचा महाराष्ट्रातील आगामी राजकीय घडामोडींवर परिणाम होण्याची शक्यता आहे

परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्या पत्नी यांचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांचं हे दुसरं पत्र

विशेष म्हणजे परमबीर सिंग यांच्यावर आरोप करणारं हे दुसरं पत्र आहे. याआधी मुंबईतीलच एका पोलीस अधिकाऱ्याने अशाप्रकारे आरोप करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवलं होतं. मात्र, आता अकोल्यात मुख्य नियंत्रण कक्षामध्ये काम करणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाने पत्र पाठवलं आहे. संबंधित पत्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागालादेखील पाठवण्यात आलं आहे.