Home आरोग्य विनाकारण फिरणा-यांना पोलिसांचा नाकाबंदीचा डोस -सोबतच कोरोना तपासणी

विनाकारण फिरणा-यांना पोलिसांचा नाकाबंदीचा डोस -सोबतच कोरोना तपासणी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8486*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

56 views
0

विनाकारण फिरणा-यांना पोलिसांचा नाकाबंदीचा डोस

-सोबतच कोरोना तपासणी

-विनाकारण फिरणा-यांचे धाबे दणाणले

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,आमगाव : शहरात करोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने पूर्ण लॉकडाउनची मागणी होत असतानाच प्रशासनाने कडक निर्बंध घातले. व सकाळी ११ वाजेनंतर विनाकारण फिरायला बंदी घातली मात्र, तरीही आमगावकरांनी घराबाहेर पडणे न थांबविल्याने पोलिसांनी नाकाबंदीचा ‘डोस’ देण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांसह पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सायंकाळी तळ ठोकला. प्रत्येक वाहनचालकाची कसून चौकशी करीत उगीच फिरणा-यांकडून दंड वसूल करण्यात आला. व सोबतच कोरोनाची रॅपिड तपासणी करण्यात आली या नाकाबंदीतहोणा-या चौकशीमुळे विनाकारण फिरणा-यांची व वाहनांची चांगलीच ‘कोंडी’ झाल्याचेही दिसले. राज्यासह शहरात करोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू असली, तरी आमगाव वासी बिनधास्त शहरात फिरताना दिसतात. सुरुवातीला पोलिसांनी सौम्य भूमिका घेत केवळ चौकशी करून नागरिकांना सोडले. पण, कारवाईतून मोकळीक मिळाल्याचा गैरफायदा घेणा-या नागरिकांना आता चाप लावण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे क्षुल्लक कारणांसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. ज्या ठिकाणी एका व्यक्तीचे काम आहे, त्या ठिकाणी दोघे-चौघे जात आहेत. हा ‘मुक्त संचार’ रोखण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदीत वाढ केली आहे. आज शहरातल्या प्रमुख चौकात पोलिसांचा फौजफाटा जमला. जिल्हाधिकारी यांच्या निदेर्शानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण व पोलीस कर्मचा-यांसह रस्त्यावरून जाणा-यांसह प्रत्येकाचीच चौकशी सुरू झाली. पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या या प्रयत्नांमुळे कोरोना संसगार्ची साखळी तोडण्यास मदत होईल हे नक्कीच.