Home गोंदिया नवीन नाली बांधकामावर पाणी टाका, शिवसेनेची मागणी

नवीन नाली बांधकामावर पाणी टाका, शिवसेनेची मागणी

0
नवीन नाली बांधकामावर पाणी टाका, शिवसेनेची मागणी

नवीन नाली बांधकामावर पाणी टाका, शिवसेनेची मागणी

-तहसिलदारामार्फत जिल्हाधिका-यांना निवेदन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, आमगाव: शहरात नाली बांधकामाचे कार्य शिवालय कन्ट्रक्शन कंपनीद्वारे सुरू असून बांधकाम करण्यात आल्यावर पाणी टाकण्यात येते परंतु बांधकाम झाल्यानंतर नाली वर पाणी टाकत नसल्याने दर बांधकाम मजबूत कसा होईल, असा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून या बांधकामावर दररोज पाणी टाकण्यात यावे अशी मागणी शहर शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. शहरात नालीचे बांधकाम शिवालय कन्ट्रक्शन कंपनीद्वारे करण्यात येत आहे. मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी आठ ते दहा दिवस पाणी टाकणे आवश्यक असते. परंतु कंपनी व अभियंत्याचे दुर्लक्ष असून येथे पाणी टाकण्यात येत नाही. तसेच शहरातील नटराज मार्गावरील पुलाचे बांधकाम करण्यात आलेले असून त्यावरही एकही दिवस पाणी टाकण्यात आले नाही. सदर बांधकाम करण्यात आले आहे याबाबत अभियंता गोयल यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी तुम्ही पाहून घ्या, असे उत्तर दिले. तसेच शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन चे नियोजन करण्यात आले नसून आपल्या मजीर्ने काम करण्यात आले आहे. याकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष देऊन सदर बांधकाम बंद करून कंत्राट दुस-या कंत्राटदाराला देण्यात यावे तसेच शिवालय कन्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आमगाव शहर शिवसेनेचे शहर प्रमुख विकास शर्मा व कार्यकर्त्यांनी केली आहे.