सिरसाळा येथे कोविड केअर सेंटर तात्काळ सुरु करा- उत्तम माने

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8477*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

181

सिरसाळा येथे कोविड केअर सेंटर तात्काळ सुरु करा- उत्तम माने

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी (परळी)-सिरसाळा येथे कोविड केअर सेंटर तात्काळ सुरु करा अशी मागणी भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य उत्तम दादा माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.सिरसाळा व परिसरात कोविड – 19 ,कोरोनाचा चा उद्रेक झाला आहे. दररोज २० ते २५ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथून माहिती मिळत असून ही गंभीर बाब आहे.
    पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना परळी अंबाजोगाई या ठिकाणी जावे लागत आहे यात मजूर वर्ग अधिक प्रमाणात आहे परळी अंबाजोगाई या ठिकाणी जाऊन उपचार घेणे परवडणार नाही व त्यांची हेळसांड खुप होत आहे. सिरसाळा हे परळी तालुक्यातील मोठी बाजार पेठ असून कोरोणा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. सिरसाळा येथे सहा खाटाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ह्या आरोग्य केंद्र अंतर्गत तांड्या सह २२ गावे आहेत. दरोज येथे अंटीजेन टेस्ट मध्ये निम्या पेक्षा अधिक लोक पाॅझिटिव्ह येत आहेत. पाॅझिटिव्ह येणा-या लोकां साठी येथेच उपचार करते यावा यासाठी सिरसाळा येथे रिक्त असणारे तीन महाविद्यालय दोन मंगल कार्यालय पैकी कोणतेही ठिकाण सोयी नुसार यांचे प्रशासनाने अधिग्रहण करून तात्काळ कोविड सेंटर उभारावे आशी मागणी उत्तम माने यांनी केली आहे.