पत्नीच्या उपचारासाठी पती ने पळविली एंबुलेंस

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8467*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

217

पत्नीच्या उपचारासाठी पती ने पळविली एंबुलेंस

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था/भोपाळ –आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी लोकं काहीही करायला तयार होतात. काहीही करण्याच्या मनस्थितीमधून अनेकदा त्यांच्या हातून गुन्हेगारी कृत्य देखील घडते. सध्या देशभर गंभीर झालेली कोरोनाची परिस्थिती सर्वांच्याच संयमाची परीक्षा पाहणारी आहे. या बिकट परिस्थितीमध्ये एका तरुणाचा संयम संपला आणि त्याने कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी चक्क आॅक्सिजन असलेल्या अँम्बुलन्सचे अपहरण केले.
मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील ही घटना आहे. या जिल्ह्यातील पुतली घाट परिसरातल्या कुशवाह कुटुंबातील गर्भवती महिला ४ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळली. या महिलेच्या पतीने आॅक्सिजनच्या सिलेंडरची व्यवस्था केली होती. मात्र तो हॉस्पिटलने आपल्या पत्नीला उपचारासाठी दाखल करुन घ्यावे, अशी विनंती तो सतत करत होता.
हॉस्पिटलमध्ये नवे पेशंट्स दाखल करण्याची क्षमता नाही हे त्याला माहिती होते. तरीही त्याच्या घरी १0८ क्रमांकाची अँम्बुलन्स आल्यानंतर त्याने त्या अँम्बुलन्सचे अपहरण केले. हा प्रकार समजल्यानंतर दोन तासांनी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या तरुणाला विनंती केली. पण त्या अँम्बुलन्समधून पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतरच पतीचे समाधान झाले. यावेळी अपहरण केलेल्या तरुणाने अँम्बुलन्सची काच फोडण्याची धमकी दिली होती, असा आरोप हॉस्पिटलमधील कर्मचा-याने केला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेचा पती शुक्रवारी रात्री ११ पासून अँम्बुलन्स घरी पाठवावी अशी विनंती हॉस्पिटलकडे करत होता. त्या रात्री त्याच्याकडे अँम्बुलन्स आली नाही. दुस-या दिवशी ९.३0 वाजता अँम्बुलन्स घरी पोहचली. त्यानंतर त्याने अपहरणाचे टोकाचे पाऊल उचलले.