
गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयांतून रेमडीसीवर इंजेक्शन चोरी करणा-या तीन आरोपीना अटक
– इंजेक्शन चोरी करणारा आरोपी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,गोंदिया : कोरोना रुग्णाचं वाढता आकडा पाहता रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवटा भासत असताना आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून रेमडीसीवर इंजेक्शन चोरी होत असल्याचा प्रकार समोर येत असून गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या आरोपीने रुग्णालयातील दोन रेमडीसीवर इंजेक्शन चोरी केले. आपल्या मित्राच्या साह्याने १५,००० प्रति इंजेक्शन प्रमाणे २ इंजेक्शन चे ३०,०००हजार रुपयात विक्री करताना अटक करण्यात आले आहे.
गोंदिया पोलिसाना मिळालेल्या माहितीच्या आधारे संजू बागडे हा आरोपी गोंदिया शहराच्या गांधी वार्डात राहत असून एका अज्ञात इसमाला रेमडीसीवर इंजेक्शन विक्री करीत असताना सापळा रचून त्याला पकडण्यात आले. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने हे इंजेक्शन दर्पण वानखेडे यांच्या कडून घेतेले असल्याचे सांगितले. तर दर्पणला विचारणा केली असता हे वैक्सीन त्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या आरोपी नितेश चिचखेडे यांच्या कडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी नितेशला विचारणा केली असता त्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध भांडारातून आणल्याचे सांगिले. पोलिसांनी तिन्ही आरोपीना अटक केली असून त्यांच्या कडून २ रेमडेसीवर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे.

