Home Breaking News वाझे कोरोना संकटामुळे जेलबाहेर येणार?

वाझे कोरोना संकटामुळे जेलबाहेर येणार?

0
वाझे कोरोना संकटामुळे जेलबाहेर येणार?

वाझे कोरोना संकटामुळे जेलबाहेर येणार?

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,मुंबई : सचिन वाझे याला पुन्हा एकदा कोरोना संकटाचा फायदा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकार कोरोना संकटाचे निमित्त करुन अनेक आरोपींना जामिनावर आणि गुन्हेगारांना पॅरोलवर मर्यादित कालावधीसाठी जेलबाहेर काढण्याची शक्यता आहे. सरकारच्या निर्णयामुळे सचिन वाझे यालाही जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई पोलीस दलातून ख्वाजा युनुस बनावट चकमक प्रकरणात सचिन वाझे याचे काही वर्षांपूर्वी निलंबन झाले होते. कोरोना संकटाचे निमित्त करुन वाझेला २०२० मध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आले. नंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी तसेच मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी वाझेला एनआयएने अटक केली. पुन्हा एकदा वाझेचे निलंबन झाले. सध्या सचिन वाझे जेलमध्ये आहे. कोर्टाने वाझेला २३ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. वाझेला तळोजा जेलमध्ये ठेवले आहे. न्यायालयीन कोठडी संपण्याच्या सुमारास वाझेला पुन्हा कोर्टात हजर केले जाईल. यावेळी त्याच्या तुरुंगवासात वाढ होऊ नये म्हणून कोरोना संकटाचे निमित्त केले जाण्याची शक्यता आहे.
राज्य सरकार वाढत्या कोरोना संकटाचे कारण देत अनेक आरोपींना जामिनावर आणि गुन्हेगारांना पॅरोलवर मयार्दीत कालावधीसाठी जेलबाहेर काढण्याची शक्यता आहे. याआधी मागच्या वर्षी देशव्यापी लॉकडाऊन झाले होते. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने तुरुंगात कोरोना पसरू नये म्हणून सुमारे दहा हजार कैद्यांना जामिनावर अथवा पॅरोलवर मुक्त केले होते. अरुण गवळीसह अनेक जण कोरोना काळात जेलबाहेर आले होते. यावेळी राज्यात कोरोना संकट वाढत आहे. यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा तुरुंगात कोरोना पसरू नये म्हणून अनेक कैद्यांना जामिनावर अथवा पॅरोलवर मुक्त करण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे कोरोना काळात नोकरी मिळवणारा सचिन वाझे कोरोना संकटामुळे जेलबाहेर येण्याची शक्यता आहे.
राज्यात ६० जेलमध्ये सुमारे ३६ हजार कैदी आहेत. यापैकी २५९ कैदी आणि १०२ जेल विभागाचे पोलीस यांना कोरोना झाला आहे. राज्यात ६ लाख ८५ हजार कोरोना अ‍ॅििक्टव्ह रुग्ण आहेत. कैदी जेलमध्ये सलग काही तास कोठडीत बंद असतात. या काळात कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा मोठा धोका आहे. या धोक्याचे निमित्त पुढे करुन राज्य सरकार अनेक कैद्यांना जामिनावर अथवा पॅरोलवर मुक्त करण्याची शक्यता आहे.
अलिकडेच मुंबईतील भायखळा जेलमध्ये ४१, आर्थर रोड जेलमध्ये ३० तर नवी मुंबईच्या तळोजा जेलमध्ये चार कैद्यांना कोरोनाची लागण झाली. शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला कोरोना झाला. आतापर्यंत ३ हजार २४९ कैद्यांना कोरोनाची बाधा झाली. तसेच जेल विभागाच्या प्रशासनात काम करणा-या ७५९ जणांना कोरोनाची लागण झाली.
जेलमध्ये ६० आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या २ हजार ७ कैद्यांना तसेच जेल विभागाच्या प्रशासनात काम करणा?्या ३ हजार १५८ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. अनेकांना अद्याप लसीकरणासाठी पात्र नसल्यामुळे लस मिळालेली नाही.