
नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तासाभरात २४ रुग्णांचा मृत्यू; नातेवाईकांचा संताप आणि आक्रोश
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नाशिक – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे (Corona Outbreak) आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले असतानाच आज नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन (Dr. Zakir Hussain Hospital) रुग्णालयात ऑक्सिजन गळती (Oxygen Leakage) झाली. गळतीमुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने या घटनेत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये (Zakir Hussain Hospital)दुपारी 12.30 वाजता ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं होतं.
रुग्णालयात १५० रुग्ण होते, यापैकी २३ रुग्ण व्हेंटिलेटर आणि इतर रुग्ण ऑक्सिजनवर आहेत होते, त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु असं सांगितलं आहे. दरम्यान विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनपा आयुक्तच यासाठी जबाबदार असून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात मोठी गर्दी होत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच नातेवाईकांच्या भावनांचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्त स्वत: घटनास्थळी उपस्थित आहेत.
या रुग्णांचा मृत्यू
1.अमरदीप नगराळे
2. भारती निकम
3. श्रावण रा. पाटील
4. मोहना दे. खैरनार
5. मंशी सु. शहा
6. पंढरीनाथ दे. नेरकर
7.सुनिल झाळके
8.सलमा शेख
9.प्रमोद वालुकर
10.आशा शर्मा
11.भैय्या सय्य्द
12.प्रविण महाले
13.सुगंधाबाई थोरात
14.हरणाबाई त्रिभुवन
15.रजनी काळे
16.गिता वाघचौरे
17.बापुसाहेब घोटेकर
18.वत्सलाबाई सुर्यवंशी
19.नारायण इरनक
20.संदिप लोखंडे
21.बुधा गोतरणे
22.वैशाली राऊत
अशी घडली घटना
नाशिक महानगरपालिकेचे डॉ. झाकिर हुसेन हे 150 बेडचे कोविड रुग्णालय असून येथे आज सकाळी 10 वाजता 157 रुग्ण दाखल होते. त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर, 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर व 61 रुग्ण क्रिटिकल होते. या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठयासाठी 13 KL चा लिक्विड ऑक्सिजन टॅंक Taiyo Nippon या कंपनीकडून भाडेतत्वावर घेण्यात आलेला आहे. उपरोक्त कंपनीकडून सदरचा टॅंक हा 10 वर्षाकरिता भाडेतत्वावर घेण्यात आलेला असून त्याची देखभाल दुरुस्ती व यामध्ये भरावयाचा लिक्विड ऑक्सिजन देण्याची जबाबदारीही कंपनीकडे आहे.
आज दुपारी सुमारे 12.30 वाजता डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे टॅंकची पाहणी केली असता, टॅंकच्या खालच्या बाजुला गळती आढळून आली. त्यामुळे टॅंकमधील ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत असल्याने रुग्णांस पुरेशा दबावाने ऑक्सिजन मिळत नसल्याचे दिसुन आले. सदरची बाब रुग्णालयातील डॉक्टर यांनी तात्काळ माझ्या निदर्शनास आणून दिली. सदरची बाब लक्षात येताच गळती दुरुस्तीसाठी शहरातील निखील गॅसचे मालक शेटे व पिनॅकल कंपनीचे इंजिनीयर यांना तातडीने घटनास्थळी बोलाविण्यात आले. फायर टेंडरमधून पाणी फवारणी करून ऑक्सिजन गळतीची जागा तज्ञांनी शोधली. सदर गळतीची पहाणी करुन गळती होणारा पाईपचा भाग दुरुस्त करुन पुन्हा जोडणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाचा ऑक्सिजनचा पुरवठा दुपारी सुमारे 1.45 ते 2 वाजता सुरळीत करण्यात आला. दरम्यानच्या काळात Taiyo Nippon या कंपनीचा लिक्वीड ऑक्सिजनचा टँकर दैनंदीन लिक्वीड ऑक्सिजन भरण्यासाठी स्थळावर आलेला होता व त्यामधून लिक्वीड ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आले. या कालावधीमध्ये ऑक्सिजन पुरवठयाअभावी दुर्देवाने 2४ रुग्णांचा मृत्यू झाला.

