जगासमोर येऊ नये म्हणून आपले पाप झाकून टाकले, क्रूर माता-पित्याने चिमुकल्या मुलीला पाण्यात बुडवून मारून टाकले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8405*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

233

जगासमोर येऊ नये म्हणून आपले पाप झाकून टाकले,
क्रूर माता-पित्याने चिमुकल्या मुलीला पाण्यात बुडवून मारून टाकले

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,भंडारा(पवनी) : येथील कु-हाडा तलावात सोमवार १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताचे दरम्यान तलावालगत गुरे चारणा-या गुराख्यांना पाण्यावर तरंगताना चिमुकला मृतदेह दिसून आले. याची माहिती परिसरात होताच तलावाचे पाळीवर बघ्यांची एकच गर्दी झाली.
कु-हाडा तलावाचे लगत बेलघाटा वॉर्ड परिसरातील भागात पाण्यात चिमुकला मृतदेह तरंगत असताना आढळून आल्याने वॉडार्तील नागरिकांनी पवनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळ गाठून तलावाचे पाण्यातून मृतदेह बाहेर काढला असता तो मृतदेह मुलीचा असल्याचे आढळून आले. तर सदरचे बाळ हे ३ दिवसापूर्वीचे असावे असा प्राथमिक अंदाज आहे.
पवनी पोलिसांनी लहानग्या मुलीचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून दफनविधी पार पाडला असून चिमुकल्या मुलीला पाण्यात बुडवून मारून टाकणा-या क्रूर आई वडिलांच्या शोध घेत असून पोलिस निरीक्षक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहययक पोलिस निरीक्षक पी. के . बैसाने तपास करीत आहेत.