मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कोरोनामुळे नागपुरात मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8395*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

240

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कोरोनामुळे नागपुरात मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर – मुंबईमध्ये 2006 मध्ये रेल्वेतसाखळी बॉम्बस्फोटघडविण्यात आले होते .याप्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी(रा. बिहार) असे मृत आरोपी असून त्याला नागपूरच्या कारागृहात ठेवले होते.

कमाल अन्सारीसह अन्य आरोपींना फाशीची शिक्षा झाली आहे. 2015 मध्ये कमाल याचीनागपूर कारागृहात रवानगी केली होती. कमाल याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले होते. 8 एप्रिल रोजी कारागृह प्रशासनाने कैद्यांचीकोरोना चाचणी केली असता 9 एप्रिलला चाचणी अहवाल आला. त्यात कमाल याच्यासह आठ जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. कारागृह प्रशासनाने कमाल याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.