Home Breaking News अभिनेत्री दिव्या भटनागरची प्राणज्योत अखेर मालवली

अभिनेत्री दिव्या भटनागरची प्राणज्योत अखेर मालवली

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8388*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

127 views
0

अभिनेत्री दिव्या भटनागरची प्राणज्योत अखेर मालवली

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, मुंबई : छोट्या पडद्यावरील एक दुःखद बातमी आहे. मागील काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर जीवन-मरणाशी झुंज देणारी अभिनेत्री दिव्या भटनागरची प्राणज्योत अखेर मालवली आहे. मध्यरात्री ३ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. स्टार प्लस वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये ‘गुलाबो’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या हिला कोरोनाची लागण झाल्यानंतर गोरेगावच्या एसआरवी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर होती. शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मागील कित्येक दिवसांपासून ती कोरोनाशी झुंज देत होती. अखेर आज तिचे निधन झाले. तिच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती प्रचंड खालावल्यानंतर दिव्याला 7 हिल्स रुग्णालयात हलविण्यात आले होते. या ठिकाणी काल रात्री २ वाजता तिची तब्येत अचानक बिघडली. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर एका तासाने तिचे निधन झाले.