Home Breaking News कोरोनामुळे तीन सख्ख्या भावांचा जीव गेला राऊत कुटुंबात पसरली शोककळा

कोरोनामुळे तीन सख्ख्या भावांचा जीव गेला राऊत कुटुंबात पसरली शोककळा

0
कोरोनामुळे तीन सख्ख्या भावांचा जीव गेला राऊत कुटुंबात पसरली शोककळा

कोरोनामुळे तीन सख्ख्या भावांचा जीव गेला
राऊत कुटुंबात पसरली शोककळा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,भंडारा(लाखांदूर) : विभक्त कुटुंबात राहत असलेतरी एकमेकांना विश्वासात घेऊन आपआपल्या कुटुंबाचा गाडा हाकणारे तीन सख्खे भाऊ एकत्र ६0 पेक्षा अधिक वयाचे होते. आणि तिघांनाही जोखमीच्या आजाराची पार्श्वभूमी होती. मागिल वर्षी सप्टेंबर महिण्यात सर्वात मोठया भावाला सर्वप्रथम कोरोनाची लागण होऊन, श्वसनाचा आजार बळावला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाच दिवसाने दुस-याचा तर १८ एप्रिल रोजी तिस-या भावाचा मृत्यू झाला. अवघ्या सात महिण्यात तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यात मोहरणा गावात शेतकरी कुटुंबातील हे तीन सख्खे भाऊ असून, दादाजी राघोबा राऊत (६६), राजेश्वर राघोबा राऊत (६१), सुरेश राघोबा राऊत (५५) अशी मृतांची नावे आहेत. दादाजी व सुरेश हे दोघे मोहरणा येथे राहत होते, तर राजेश्वर हे कुडेगाव गावात राहत होते. मृतक भावंड शेतकरी कुटुंबातील असले तरी समाजकारण व राजकारणात त्यांचे मोठे योगदान होते. गतवर्र्षी २३ सप्टेंबर २0२0 रोजी मृत पावलेले दादाजी राऊत हे लाखांदूर पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत. तर राजेश्वर व सुरेश हे उत्कृष्ठ शेतकरी म्हणून परिचित होते. मृत पावलेल्या तिघांव्यतिरीक्त अन्य तीन भाऊ हयात असून, या सहाही भावांचे गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात मोठे योगदान होते. सहापैकी मृत पावलेल्या तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. गेल्यावर्षी सप्टेंबर महिण्यात दादाजी व सुरेश यांचा सहा दिवसाच्या अंतराने मृत्यू झाल्यानंतर या आठवड्यात पाच दिवसापूर्वी राजेश्वर यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांना ब्रह्मपुरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, रविवार, १८ एप्रिल रोजी राजेश्वर यांचा देखील मृत्यू झाला. एकामागोमाग एक अशा घरातील तीन ज्येष्ठ सदस्यांना गमाविल्यामुळे राऊत कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.