Home Breaking News आता सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू राहणार अत्यावश्यक वस्तूंची दुकाने

आता सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू राहणार अत्यावश्यक वस्तूंची दुकाने

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8374*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

159 views
0

आता सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू राहणार अत्यावश्यक वस्तूंची दुकाने

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपू : नागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप तीव्र गतीने वाढत आहे. शहरात कोरोना झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरात वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर प्रतिबंध करण्यासाठी काही कडक निर्बंध मंगळवारपासून (२0 एप्रिल) अंमलात येणार आहे. यात औषधीची दुकाने वगळता इतर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. या संदभार्तील आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी काढले.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी प्रेस क्लब येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनीही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे दुकानांच्या वेळा निधार्रीत करण्यात येत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, गरजू रुग्णांना बेड मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन व महानगरपालिका यांच्या समन्वयाने बेड मॅनेजमेंट करण्यात येत आहे. जिल्ह्?ात एकूण ८ हजार १२८ बेडस उपलब्ध आहे. ग्रामीण भागात ३१ रुग्णालयांमध्ये २0३ साधे बेड, १२४७ आॅक्सिजन बेड तर ८८ व्हेटिंलेटर बेड आणि कोविड केअर सेंटरमध्ये ५१३ बेड आहेत. ग्रामीण भागात एकूण १७९२ बेड उपलब्ध असून ४३६ ने बेड संख्या वाढविली आहे. तर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये ४0१४ बेड आहेत. मेयो, मेडिकल, एम्समध्ये एकूण १८00 बेड आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता शहरातील २३ हॉटेल्समध्ये कोविड केअर सेंटरसाठी परवानगी देण्यात आली आहे. लसीकरण हाच रामबाण उपाय असून आजपर्यत ७ लाख ४0 हजार ६५ नागरिकांनी लसीचा पहीला व दुसरा डोस घेतला आहे. भविष्यात सर्वांचे लसीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कोविड मृतकांवर नि:शुल्क अंत्यसंस्कार : सोमवारी जिल्ह्यात तीन हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले आहे. गरजू रुग्णांनाच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. या इजेंक्शनचा काळाबाजार होत असल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. कोविड मृतकांवर नि:शुल्क अंत्यसंस्कार करावे असे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. रुग्णांच्या सेवेसाठी अंतिम वर्ष डॉक्टर,नर्सिंग स्टाफची मदत घेत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. वाढती रुग्णसंख्या पाहता शहरातील २३ हॉटेल्समध्ये कोविड केअर सेंटरसाठी परवानगी देण्यात आली आहे. लसीकरण हाच रामबाण उपाय असून आजपर्यत ७ लाख ४0 हजार ६५ नागरिकांनी लसीचा पहीला व दुसरा डोस घेतला आहे. भविष्यात सर्वांचे लसीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कोविड मृतकांवर नि:शुल्क अंत्यसंस्कार : सोमवारी जिल्ह्यात तीन हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले आहे. गरजू रुग्णांनाच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. या इजेंक्शनचा काळाबाजार होत असल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. कोविड मृतकांवर नि:शुल्क अंत्यसंस्कार करावे असे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. रुग्णांच्या सेवेसाठी अंतिम वर्ष डॉक्टर,नर्सिंग स्टाफची मदत घेत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.