Home Breaking News इस्त्रायल देश कोरोनामुक्त, मास्कवरील निर्बंधही हटवले

इस्त्रायल देश कोरोनामुक्त, मास्कवरील निर्बंधही हटवले

0
इस्त्रायल देश कोरोनामुक्त, मास्कवरील निर्बंधही हटवले

इस्त्रायल देश कोरोनामुक्त, मास्कवरील निर्बंधही हटवले

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,जेरुसेलम (न्युज ब्युरो)– जगभरातील सर्वच देशांत कोरोनाचा (Corona) शिरकाव झाल्याने कोरोना हा आजार जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आला होता. जगावर आरोग्य आणीबाणी (Health Emergency)घोषित करण्यात आली होती. संपूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी पहिल्या लाटेनंतर अनेक लाटाही उसळल्या. मात्र, कोरोनाचा समूळ नाश करण्यास कोणत्याच देशाला शक्य झालं नव्हतं. सगळीकडून कोरोनाच्या नकारात्मक बातम्या येत असताना इस्त्रायल या देशाने अत्यंत सकारात्मक बातमी दिली आहे. इस्त्रायलमध्ये कोरोनाचा समूळ नाश झाला असून तेथील नागरिकांना आता मास्कची सक्ती करण्यात आलेली नाही. लसीकरणाच्या जोरावर इस्रायलने हे करुन दाखवलं आहे.

१ कोटी लोकसंख्या असलेल्या इस्त्रायला हे शक्य झालंय ते वेळीच केलेल्या लसीकरणामुळे. तिथल्या लोकांनी आपल्या स्वभावात आणि राहणीमानात थोडेफार बदल केले आणि लसीकरणावर भर दिला. म्हणूनच इस्त्राइल हा देश आता कोरोनामुक्त झाला आहे. मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतरही इस्त्रायल नागरिकांना काही नियम पाळायला सांगितलं आहे.

इस्रायलमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक नसेल. मात्र बंदिस्त ठिकाणी आणि गर्दी होण्याऱ्या कार्यक्रमात मास्क घालणं बंधनकारक असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच शिक्षण संस्थाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर खुल्या शाळांमध्ये मास्क घालण्यास कोणतंही बंधन नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच विदेशी पर्यटकांचं येत्या मे महिन्यापासून लसीकरण करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी इस्रायलमध्ये ८ लाख ३६ हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी ६ हजार ३३१ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे खडबडून जागं झालेल्या प्रशासनाने लसीकरणावर जोर दिला. देशातील एकूण लोकसंख्येपैकी ५३ टक्के जनतेचं लसीकरण केल्याचं आरोग्यमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलं आहे. जवळपास ५३ टक्के नागरिकांना कोरोना लसीचा दूसरा डोस देण्यात आला आहे. या लसींमध्ये पी फायझर आणि बायो एनटेक लसींचा समावेश आहे

इस्रायलनं डिसेंबर महिन्यात लसीकरण मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर मृत्यूचा आकडाही कमी झाला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.