प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या पत्नीचे कोरोनामुळे दुःखद निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8359*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

352

प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या पत्नीचे कोरोनामुळे दुःखद निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,मुंबई- सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या पत्नी ज्योती मिलिंद शिंदे यांचे वयाच्या 54व्या वर्षी सोमवारी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या सहा दिवसांपूर्वी मिलिंद आणि ज्योती या दांपत्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारार्थ दुर्गाडी जवळील एका खाजगी कोवीड रुग्णालयातील एकाच वॉर्ड मध्ये औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

ज्योती यांचे कालच रेमडीसेव्हर इंजेक्शनचे 6 डोस पूर्ण झाले होते. परंतु आज पहाटे 5 चे दरम्यान औषधोपचार चालु असतांनाच त्यांची प्राण ज्योत मालवली. सध्या याच रुग्णालयात मिलिंद शिंदे यांचेवरही औषधोपचार चालु असुन त्यांनाही आजपर्यंत रेमडीसेव्हरचे 4 डोस देण्यात आले आहेत.
दिवंगत ज्योती शिंदे यांच्या पार्थिवावर विठ्ठलवाडी स्मशान भूमित मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी नुकतेच कोरोनातुन मुक्त झालेले सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. ज्योती शिंदे यांच्या पश्चात पती मिलींद शिंदे, अंकूश, मयुर ही दोन विवाहीत मुले, दोन सुना, तर अविवाहीत मुलगा मधुर आणि अविवाहीत मुलगी स्वरांजली, असा परिवार आहे.