रेमडेसीवीरच्या मागणीसाठी नागपुरात भाजपचे चारही आमदारांचे धरणे आंदोलन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8355*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

237

रेमडेसीवीरच्या मागणीसाठी नागपुरात भाजपचे चारही आमदारांचे धरणे आंदोलन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर- नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा एकही व्हॉयल सरकारकडून पुरवण्यात आलेला नाही. त्यामुळे आज सोमवारी संतप्त भाजपच्या चार आमदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत खासदार विकास माहात्म्ये, विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दटके आणि आमदार गिरीश व्यास, विधानसभेचे आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे यांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला.
नागपूरसाठी तात्काळ औषधसाठा, आॅक्सिजन, रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्या, याबाबत जोपर्यंत आदेश काढणार नाही, तोपर्यंत धरण्यावरून उठणार नसल्याचा इशारा भाजपच्या या नेत्यांनी दिला. राज्य सरकार अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरवताना नागपूर जिल्ह्यावर अन्याय करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतर जिल्ह्याला द्यायच्या असतील तेवढ्या सुविधा द्या पण, नागपूर जिल्ह्यावर अन्याय करू नका. नागपूर शहरातील वाढत्या मृत्यूंना सरकार कारणीभूत असल्याचा आरोप या आमदारांनी केला. पश्चिम महाराष्ट्रात अनेक हेवी वेट नेत्यांनी त्यांच्या भागात औषधांचा साठा नेल्याचा आरोपही त्यांनी केला.