Home Breaking News आरोग्य कर्मचारी कसे लावणार कोरोनावर प्रतिबंध? केंद्र सरकारने विमा संरक्षण योजना केली...

आरोग्य कर्मचारी कसे लावणार कोरोनावर प्रतिबंध? केंद्र सरकारने विमा संरक्षण योजना केली बंद

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8348*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

90 views
0

आरोग्य कर्मचारी कसे लावणार कोरोनावर प्रतिबंध?
केंद्र सरकारने विमा संरक्षण योजना केली बंद

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाशी खेळत रुग्णांचा प्राण वाचवत आहेत. या युद्धात अनेक आरोग्य कर्मचा-यांनीही आपला जीव गमावला आहे. मात्र, त्यांच्या पश्चात त्यांच्या कार्याची दखल म्हणून केंद्र सरकारकडून ५० लाखांचं विमा संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र, हे विमा संरक्षण आता काढून घेण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना संपुष्टात आणत असल्याचं म्हटलं आहे. करोना कालावधीमध्ये आपले कर्तव्य बजावताना संसर्ग झाल्याने मरण पावलेल्या आरोग्य कर्मचा-यांना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण देण्यात येत होतं.

कोरोना काळात कर्तव्य बजावणा-या आरोग्य कर्मचा-यांचा मृत्यू झाल्यास त्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील महिन्यामध्ये राज्य सरकारांना पाठवलेल्या नोटीसमध्ये २४ मार्चपासून ही योजना बंद करण्यात आल्याचं म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत २८७ अर्ज असल्याचंही केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ३० मार्च २०२० पासून राबवण्यात येत होती. कोरोना कालावधीमध्ये कर्तव्य बजावणा-या आरोग्य कर्मचा-यांना विमा संरक्षण पुरवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आलेली. सुरुवातीला केवळ ९० दिवसांसाठी ही योजना राबवण्यात आली. ज्यामध्ये आरोग्य कर्मचा-यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात आलं होतं. नंतर या योजनेचा कालावधी २४ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आला,असं या पत्रामध्ये म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या पत्रामध्ये, ही योजना आरोग्य कर्मचा-यांसाठी फायद्याची ठरली. आरोग्य कर्मचा-यांना सुरक्षा पुरवणे तसेच कोरोना कालावधीमध्ये कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांना यामुळे फायदा झाला. ही योजना नियोजित तारखेला बंद करण्यात आलीय,असं म्हटलं आहे.

या पत्रामध्ये भूषण यांनी योजनेअंतर्ग २८७ अर्ज मान्य करण्यात आल्याची माहिती दिलीय. विमा कंपन्यांनी हे अर्ज मान्य केले असून काहींना विम्याची रक्कमही देण्यात आल्याचं पत्रात म्हटलं आहे. मात्र इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमएने) दिलेल्या माहितीनुसार किमान ७३६ डॉक्टरांचा कोरोना कालावधीमध्ये मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्या ७३६ डॉक्टरांपैकी २८७ जणांच्या नातेवाईकांनाच विम्याचे ५० लाख रुपये देण्यात आले, असं डॉक्टर रवी वानखेडकर यांनी इंडिया टुडेशी बोलताना म्हटलं आहे.

केंद्र सरकारने कोरोना कालावधीमध्ये किती आरोग्य कर्मचा-यांचा मृत्यू झाला यासंदभार्तील अधिकृत आकडेवारी अद्याप जारी केलेली नाही. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये २४ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत करण्यात आलेले अर्ज गृहित धरले जाणार असून या अर्जांची छाणणी करण्यासाठी आणि अर्ज निकाली काढण्यासाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात येणार आहे. कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतरच विम्यासाठी अर्ज करता येणार असल्याचंही सचिवांनी स्पष्ट केलं आहे.