Home Breaking News राज्य पुरस्कारांसह राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपलं नाव कोरणाऱ्या प्रसिद्ध मराठी दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन

राज्य पुरस्कारांसह राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपलं नाव कोरणाऱ्या प्रसिद्ध मराठी दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन

0
राज्य पुरस्कारांसह राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपलं नाव कोरणाऱ्या प्रसिद्ध मराठी दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन

राज्य पुरस्कारांसह राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपलं नाव कोरणाऱ्या प्रसिद्ध मराठी दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, पुणे : राज्य पुरस्कारांसह राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपलं नाव कोरणा-या प्रसिद्ध मराठी दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 78 वर्षाच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.
सुमित्रा भावे यांनी सुनील सुकथनकर यांच्या साथीने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. हलक्या फुलक्या पद्धतीने सामाजिक विषयांना हात घालणारे चित्रपट त्यांनी दिले. दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा,नितळ, एक कप च्या, घो मला असला हवा, कासव, अस्तु अशा अनेक चित्रपटांना सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर जोडीचा परिसस्पर्श लाभला. घो मला असला हवा या सिनेमातून राधिका आपटेसारखी हरहुन्नरी कलाकार मनोरंजन विश्वाला मिळाली.

सुमित्रा भावे यांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार
बाई : 1985 : सर्वोत्कृष्ट कुटुंबकल्याण चित्रपट
पाणी : 1987 : सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट
वास्तुपुरुष : 2002 : सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
देवराई : 2004 : सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट
अस्तु : 2013 : सर्वोत्कृष्ट पटकथा
कासव : 2016 : सर्वोत्कृष्ट चित्रपट

राज्य शासन पुरस्कार विजेते चित्रपट
दोघी
दहावी फ
वास्तुपुरुष
नितळ
एक कप च्या सुमित्रा भावे यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 78 वर्षाच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.

बाई, पाणी लघुपटांना लोकप्रियता आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी 1995 मध्ये ह्यदोघीह्ण हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. या चित्रपटालाही प्रेक्षक-समीक्षकांकडून पसंतीची मोहोर मिळाली. त्यांचे अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गाजले; तसे अनेक चित्रपटांना राज्य शासन आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले.