बिबट्याचे कातडे विकने महागात पडले, न्यायालयाने वनकोडीत रवाना केले

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,गडचिरोली : शहरातील मृत बिबटाचे कातडी विक्री करणा-या नागरिकांची घरी आरमोरी वनपरिक्षेत्र अधिका-यांनी १५ एप्रिल रोजी धाड टाकून बिबट्याचे कातडी, नखे जप्त केली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली. यशवंत सोनबाजी निखारे, सुभाष पंढरी धकतो, विश्राम शंकर रामटेके, सुदाम पांडुरंग कांबळे, ईश्वर विस्तारी सोरते सर्व रा. आरमोरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
आरमोरी परिक्षेत्रातील आरमोरी शहरात मृत बिबट वन्यप्राण्याचे कातडे विक्री करण्याचे उद्देशाने साठवून ठेवल्याची गुप्त माहिती आरमोरी वनपरिक्षेत्र अधिका-यांना मिळली. यावरून वनविभागाच्या अधिका-यांनी तोतया ग्राहक तयार करून विक्रीत सहभागी असलेल्या यशवंत सोनबाजी निखारे, सुभाष पंढरी धकतो, विश्रा शंकर रामटेके, सुदाम पांडुरंग कांबळे, ईश्वर विस्तारी यांच्याकडून मृत बिबटाचे कातडे, नखे हस्तगत केली. सदर आरोपींना न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय आरमोरी येथे हजर केले असता १९ एप्रिल पर्यंत वनकोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याची शक्यता असल्याने वनविभागाच्यावतीने चौकशी होत आहे.
सदर कारवाई वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर, सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एम. डोंगरवार, वडसाचे आर. बी. इनवते, आरमोरीचे क्षेत्र सहायक आर.पी. कुंभारे, वनरक्षक एस.पी. तिजारे, बी.एन. शेंडे, एन.एम. तुमपल्लीवार, के.एस. गिन्नलवार, आर.बी. सहारे, पी.एच. करकाडे, श्रीकांत सेलोटे यांच्यासह आरमोरी परिक्षेत्रातील कर्मचा-यांनी केली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एम. डोंगरवार हे करीत आहेत.

 

You missed