मृत्युच्या भीतीने कोविड सेंटरमधून पळाला, अखेर रस्त्यावर त्याने जीव गमावला

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8324*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

184

मृत्युच्या भीतीने कोविड सेंटरमधून पळाला, अखेर रस्त्यावर त्याने जीव गमावला

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : कोविड सेंटरमध्ये नजरेसमोरच दोन जणांचा जीव गेला. या धक्क्यातून तो स्वत:ला सावरू शकला नाही. रात्री उशिरा आॅक्सिजन काढल्यानंतर आरोग्य यंत्रणेला हुलकावणी देत त्याने पळ काढला. अखेरीस सकाळी ‘त्या’ रुग्णाचा मृतदेहच रस्त्यावर आढळून आला. उमरेड येथील या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. राजेश बाबुराव नान्हे (३५, रेवतकर ले-आऊट, उमरेड) असे मृताचे नाव आहे.
राजेश नान्हे खासगी चारचाकी वाहने किरायाने देण्याचा व्यवसाय करीत होता. अचानक तो कोरोनाबाधित झाला. त्याला १४ एप्रिल रोजी उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. शुक्रवारी रात्री तो कोविड सेंटरमधून पळाला. सर्वत्र शोधाशोध सुरू झाला. अखेरीस नगर परिषद इतवारी प्राथमिक शाळेलगत तो मृतावस्थेत आढळून आला. नगर पालिका कर्मचारी आणि कुटुंबातील काही सदस्यांनी योग्य खबरदारी घेत त्याचा अंत्यविधी पार पाडला.