Home आरोग्य डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक चिकित्सालय पुन्हा सुरू करण्याची परवानगी

डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक चिकित्सालय पुन्हा सुरू करण्याची परवानगी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8320*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

138 views
0

डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक चिकित्सालय पुन्हा सुरू करण्याची परवानगी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : उत्तर नागपूर येथील डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक काढा मुळे मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित झालेले रुग्ण कोरोना मुक्त होत असताना महानगरपालिका यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अचानकपणे डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचे चिकित्सालयला बंद करण्याचे आदेश 14 एप्रिल 2021 रोजी दिले होते. त्यामुळे हजारोंच्या संख्येने लाभ घेणारे कोव्हीड संक्रमित रुग्ण या औषधी पासून वंचित झाले होते. डॉ. प्रज्ञा मेश्राम व युवराज मेश्राम यांच्यावर अन्याय झाल्याचे लक्षात येताच शिवसेना विभाग प्रमुख अखिल खापेकर यांनी ताबडतोब त्यांची भेट घेतली व त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व आभार व्यक्त केले. डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक चिकित्सालयला पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या लोकांनी आनंद व्यक्त करून जयघोष केला. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख अखिल खापेकर, प्रभाग प्रमुख अरविंद नांदगावे, मयुर चिमुरकर, गुंजार कडू, नीलेश खापेकर, बंडू खंडारे या सर्व शिवसैनिकांचा सहभाग होता.