
दारिद्र्य
परखड मत मांडता यायला हवे
न बघता स्वत:चे फायदे वा तोटे
बिना कण्याने जगणारे असतात
गुळमुळीत गोटे बिंनपेंद्याचे लोटे
चाटूगिरी काहींना हुशारी वाटते
प्रत्यक्षात आहे गंभीर आजार
सज्जन लोक गप्प राहिले तर
माजतो कपटी जनांचा बाजार
शरीराप्रमाणे मनही स्वस्थ हवे
दोन्ही पडायला नको आजारी
आपली प्रगती घडवायची तर
निंदकाचे घर असावे शेजारी
कपट करणारे शेखी मिरवतात
लपून राहत नाही त्यांचे चारित्र्य
कुबेराचा खजाना असला जरी
त्यांचे संपत नाही गुणांचे दारिर्द्य
-
स्वप्ना अनिल वानखडे
वर्धा
७३७८८९२५८४

