
आम्ही विश्व लेखिका या संस्थेचा भव्य शुभारंभ
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरील लेखिकांना लेखनासाठी एक भव्य व्यासपीठ मिळावे तसेच या स्तरावर विविध साहित्यिक उपक्रम राबवण्यात यावेत या दृष्टीने लेखिकांसाठी आम्ही विश्व लेखिका या संस्थेची उभारणी करण्यात आली. त्याचा उद्घाटन समारंभ गुढीपाडव्याच्या दिवशी 13 एप्रिल 2021 रोजी करण्यात आला. कराडचे ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते कै. मोहन कुलकर्णी,कराड हे या संस्थेचे आधारवड होते. जागतिक स्तरावरील तळागाळातील लेखिकांना एकत्र करून यांचे एक भव्य साहित्य संमेलन आयोजित करावे यासाठी त्यांनी अनेक लेखिकांना संघटित केले. परंतु कोरोनाच्या काळाने त्यांच्यावर घाला घातला व त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही विश्व लेखिका कटिबद्ध आहे. या संस्थेच्या भारतभर विविध जिल्हा शाखा आहेत. या संस्थेचे काम अत्यंत नियोजनबद्ध रीतीने चालू आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा प्रमुख आहेत. विभागीय स्तरावर विभाग प्रमुख आहेत. अध्यक्ष आहेत मा. प्रा. पद्मा हुशिंग, ठाणे व उपाध्यक्ष आहेत मा. प्रा. विजया मारोतकर,नागपूर .
या संस्थेचा भव्य उदघाटन सोहळा आॅनलाइन पद्धतीने आम्ही विश्व लेखिका या फेसबुक पेजवर वर घेण्यात आला. दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन, गुढी पूजन करून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. सरस्वती वंदना संपदा दळवी यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर केली. अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ मान्यवर लेखिका यामध्ये सहभागी आहेत. सन्माननीय ज्येष्ठ व श्रेष्ठ सल्लागार आहेत सुप्रसिद्ध साहित्यिक आ. डॉ. विजयाताई वाड,आ. माधवीताई घारपुरे, आ. वासंतीताई वर्तक व सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्य आहेत.
आ. प्रा. मेधाताई सोमण,आ. शरयू शहा मुंबई, आ.भारतीताई मेहता व आ.नयना सहस्त्रबुद्धे आ. दीपाताई पटवर्धन, ठाणे,आ. लीलाताई शहा,आ. शुभांगी भडभडे,विदर्भ,आ. विजयाताई ब्राम्हणकर, नागपूर
या सर्वांनी व्हिडिओ च्या माध्यमातून या संस्थेला शुभेच्छा दिल्या व संस्थेची धुरा समर्थपणे खांद्यावर घेतल्याबद्दल सर्व पदाधिका-यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आम्ही विश्व लेखिका संस्थेची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.
1)अध्यक्ष- प्रा.पद्मा हुशिंग,ठाणे
2)उपाध्यक्ष- प्रा. विजया मारोतकर, नागपूर
3)सचिव- वृषाली राजे, ठाणे,
4)सहसचिव- मानसी जोशी, ठाणे,
5)खजिनदार-संगीता चव्हाण, ठाणे,
6) सह खजिनदार- अस्मिता चौधरी, ठाणे
कार्यकारिणी सदस्य-
7)मंजिरी ताई कुलकर्णी, कराड,
8)देविकाताई देशमुख, अकोला
9)एडवोकेट सीमंतिनी नूलकर,सातारा
10) अश्विनी निवर्गी, उदगीर,
11)माधुरी चौधरी, औरंगाबाद,
12)सुनेत्रा जोशी, रत्नागिरी,
13)विजया पंडितराव, ठाणे.
या सर्वांनी आपल्याला दिलेल्या जबाबदारी बद्दल आपल्या मनात असलेल्या कल्पना, भूमिका व योजना स्पष्ट केल्या. अध्यक्षीय समारोपात प्रा.पद्मा हुशिंग म्हणाल्या की सर्वांना सोबत घेऊन जाणे, सर्वांमध्ये समन्वय ठेवणे व साहित्यिक वाटचाल तळमळीने करत राहणे व यशाची गुढी आंतरराष्ट्रीय स्तरावर उभारणे या यादृष्टीने ही संस्था प्रयत्न करेल. साहित्य निर्मिती व साहित्य प्रकाशन यादृष्टीने ही संस्था प्रयत्न करेल.
उपाध्यक्ष मा. प्रा. विजया मारोतकर म्हणाल्या की ख-या सोन्यालाच अग्निपरीक्षा द्यावी लागते परंतु त्यातून ते तावून सुलाखून बाहेर पडते . ही संस्था लवकरच खूप मोठी उंच भरारी घेईल व त्यासाठी त्यांनी सर्व लेखिकांना शुभेच्छा दिल्या. यानंतर अनेक जिल्हाप्रमुखांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यापैकी काही जणी म्हणजे मंदाकिनी क्षीरसागर बीड, बालिका बरगळ हिंगोली, शुभांगी दळवी सातारा, उर्मिला पांगम कोल्हापूर, अर्चना नळगीरकर उदगीर,(लातूर), कविता पुदाले उस्मानाबाद, मंगलताई नागरे,वाशिम ,निशा डांगे,यवतमाळ, नीता ताई बोबडे,बुलढाणा, जयश्री कोटगीरवार,वर्धा ज्योतीताई पुजारी, डॉ. वसुधा पांडे, मीना खोंड, स्वाती सुरंगळीकर, डॉ. अंजली टाकळीकर,नागपुर,भारतीताई भोरे,कारंजा लाड कविताताई कठाणे.भंडारा या शिवाय अनेक लेखिकांनी स्वत:च्या भावना व्यक्त करत संस्थेला पुढील कायार्साठी शुभेच्छा दिल्या.
शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या भव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अश्विनी निवर्गी, उदगीर यांनी केले . या संस्थेकडून असे आवाहन करण्यात आले आहे की जास्तीत जास्त लेखिकांनी या संस्थेने चालवलेल्या साहित्यिक चळवळीत सहभागी व्हावे.

