डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने गोरगरीब विद्यार्थ्यांना आरटीई फाउंडेशन तर्फे मोफत शालेय पुस्तक वितरित

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8288*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

250

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने गोरगरीब विद्यार्थ्यांना आरटीई फाउंडेशन तर्फे मोफत शालेय पुस्तक वितरित

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून शिवाजी नगर, महाल येथील आचार्य बुद्ध विहार येथे वस्तीतिल गोरगरीब विद्याथ्यार्ची शैक्षणिक प्रगती होण्याकरिता आरटीई फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.सचिन काळबांडे यांनी शालेय पुस्तक मोफत वाटप केले. सध्याची परिस्थिती राज्यात फारच चिंताजनक आहे व प्रत्येक पालक चिंतेत आहे, लाखो परिवार कोरोना संक्रमनाने ग्रस्त आहेत, कित्येक परिवारातील जीव गेलेले आहेत, विद्यार्थी अनाथ झालेले आहेत, अशा परिस्थितित पालकांची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने सदर उपक्रम राबवून आम्बेडकरांचे विचार तळागाळात पोहोचने गरजेचे असल्याने कठिन प्रसंगी हिम्मत देण्याचे कार्य करून काळबांडे यांनी सम्पूर्ण राज्यात सदर उपक्रम करण्याचा मानस धरला. ह्याप्रसंगी उपाध्यक्ष राम वंजारी व राज्यातील सम्पूर्ण पदाधिकारी ज्यामध्ये मुंबई शहर प्रमुख भरत मलिक, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रेम शामनानी, प्रमुख पदाधिकारी तात्यासाहेब पंडितराव शिदे, निलेश पांडे, नितीन बिडकर, बाटू पाटिल, खुशाल सूर्यवंशी, नितिनजैन, उत्कर्ष पवार, वर्धा जिल्हा समन्वयक दिनेश चन्नावार, जिल्हाध्यक्ष नितिन वड़नारे, पदाधिकारी पंकज चोरे, भंडारा जिल्हा प्रमुख राजेश नंदापुरे, महेन्द्र वैद्य, शांतलवार, चंद्रपूर जिल्हा प्रमुख प्रशांत हजबन, कोल्हापुर जिल्हा प्रमुख महेश पोळ व अनिता पाटील, सोलापूरचे हरीश शिंदे, औरंगाबादचे मेसाचे प्रल्हाद शिंदे, अहमदनगर चे देविदास घोडके, अमरावती जिल्हा प्रमुख शोएब खाँन, वाशिम जिल्हा प्रमुख अभी देशमुख यांनी सदर उपक्रम जिल्हा निहाय राबविन्यात सहकार्य केले.