
विश्वासघात झाला,भावानेच फसवले भावाला
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-चंद्रपूर : बहुजन समाज पार्टी चंद्रपूरचे नेते व माजी जिल्हा महासचिव घुग्घूस येथील भीमेंद्र कांबळे यांच्यावर त्यांचे सख्खे भाऊ आणि आधारस्तंभ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष मयत हरिशचंद्र पुंडलिक कांबळे यांची व त्यांचे व्यावसायिक भागीदार फियार्दी कृष्णकांत वर्मा यांच्या मालकीची व मयताच्या नावावर रजिष्ट्री विक्रीपत्र असलेली मौजा सावंगी मेघे, ता. जि. वर्धा मौजा क्रमांक २0२/१ , प्लॉट क्रमांक ३६/१, आराजी १३९.५0 हा प्लॉट त्यांच्या मृत्यू पश्चात आरोपी भीमेन्द्र कांबळे व सहआरोपी महेंद्र भगत तथा त्यांच्या परिवारातील लोकांनी मिळून दुय्यम निबंधक वर्धा यांचे सोबत संगनमत करून मृतकाचे छायाचित्र विक्री पत्रावर लावून मृतकाच्या ऐवजी तोतया व्यक्तीला रजिष्ट्री च्या वेळी हजर करून त्याचा अंगठा निशाणी विक्रीपत्रावर घेऊन खोटा दस्तऐवज तयार केला व सदर प्लॉटची विक्री संगिता सिद्धार्थ कोसमकर रा. सावंगी मेघे ता. जि. वर्धा यांना दि. १८ जानेवारी २0१९ रोजी परस्पर केली.
वरील कारणास्तव फियार्दी कृष्णकांत गयाप्रसाद वर्मा रा. शालीकराम नगर, घुग्घूस यांच्या तक्रारीनुसार आरोपी भीमेन्द्र कांबळे व महेंद्र भगत यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ४१९, ४२0, ४६५, ४६८, ४७१ व ३४ नुसार पोलिस स्टेशन सावंगी मेघे ता. जि. वर्धा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी भीमेन्द्र कांबळे अटक करण्यात आली आहे. मात्र दुसरा आरोपी महेंद्र भगत मात्र फरार असून त्याला अद्यापही अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दुस-या आरोपीस अटक करण्यात सावंगी मेघे पोलिस हयगय करीत असून त्यास वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा फियार्दीने आरोप केला आहे. सदर प्रकरणातील विक्रीपत्र केलेल्या प्लॉटचे आममुखत्यारपत्र मयत हरीशचंद्र कांबळे यांनी दि .५ जानेवारी २0१९ रोजी केलेले असून तेसुद्धा खोटे व बोगस असण्याची दाट शक्यता फियार्दीने व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिस स्टेशन सावंगी मेघेचे सहायक पोलिस निरीक्षक डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून आरोपी कांबळे यास ५ दिवसांची पोलिस कस्टडी न्यायालयाने दिली.

