निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8274*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

169

निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, वृत्तसंस्था-हरिद्वार : हरिद्वार येथील कुंभ मेळ्यात मध्यप्रदेशहून आलेले निवार्णी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोना संसगार्मुळे निधन झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, महामंडलेश्वर कपिल देव हे कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यावर त्यांना देहरादून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणीच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात कोरोनाच्या पाश्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे मोठ्याप्रमाणावर उल्लंघन झाले. मागील ७२ तासांमध्ये दीड हजारांहून अधिक पॉझिटिव्ह केसेस केवळ हरिद्वार कुंभ मेळा परिसरातू समोर आल्या आहेत. शिवाय अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे. कोरोनाबाधितांची संख्या आता आणखी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा दिलेला इशारा धुडकावून बुधवारी हजारो साधूंनी हरिद्वारमधील हर की पैरी येथे गंगा नदीत कुंभमेळ्यातील तिसरे शाहीस्नान केले. सामाजिक अंतराच्या नियमांची पायमल्ली करून दुस-या शाहीस्नानालाही साधूंसह अन्य भाविकांनी गर्दी केली होती.
हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात कोरोना नियमांचे मोठया प्रमाणावर उल्लंघन झाले. हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यात करोनाच्या पाश्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले होते. ७२ तासांमध्ये दीड हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण केवळ हरिद्वार कुंभ मेळ्यातून समोर आले आहेत. शिवाय अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही प्रशासनाने दिलेला इशारा धुडकावून लावत बुधवारी हजारो साधूंनी हरिद्वारमधील हर की पैरी येथे गंगा नदीत तिसरे शाहीस्नान केले. या परिसरात कोणतेही बंधन नाही. तसेच येथे ना मास्क आहे ना थर्मल स्क्रिनिंग करण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.