Home Breaking News योगी सरकारचा अजब फतवा, कोरोनाने मृत्युंचा आकडा लपवा ?

योगी सरकारचा अजब फतवा, कोरोनाने मृत्युंचा आकडा लपवा ?

0
योगी सरकारचा अजब फतवा, कोरोनाने मृत्युंचा आकडा लपवा ?

योगी सरकारचा अजब फतवा, कोरोनाने मृत्युंचा आकडा लपवा ?

– उत्तरप्रदेशात अनेक स्मशानभूमीत रोज जाळल्या जात आहे शेकडो शव
– हे विदारक सत्य लपविण्यासाठी टीनपत्रे लावून स्मशानभूमींना केले सील

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, वृत्तसंस्था-लखनऊ : सोशल मीडियावर लखनौमधील स्मशानभूमीतील विदारक चित्र दाखवणारे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशातील कोरोना मृत्यूचा आकडा आणि स्मशानभूमीतील मृतांचा आकडा यात तफा वत निर्माण झाल्याने प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती होत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये प्रशासनाने स्मशानभूमी पत्र्याच्या शीट लावून ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे जेणेकरुन आतील दृष्ये कोणालाही पाहता येणार नाहीत.
काही दिवसांपूर्वी लखनौमधील स्मशानभूमीत मोठ?ा प्रमाणावर मृतदेह जळत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे प्रशासन कोरोना मृत्यू लपवत तर नाही ना अशी चर्चा सुरु झाली. त्यामुळे प्रशासनाने स्मशानभूमीत काय सुरु आहे हे बाहेरून पाहता येऊ नये म्हणून पत्र्याच्या शीट लाण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर स्मशानभूमीच्या बाहेर एक नोटिस लावली आहे. त्यात परवानगी नसलेल्या लोकांना आता स्मशानभूमीत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कारण हा आता कोरोना प्रभावित भाग आहे. जर याचे कोण उल्लंघन केले तर त्याला कडक शिक्षा करणार असल्याचेही नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रशासनाचे हे पाऊल म्हणजे सत्य लपवण्याचा प्रकारच असल्याची टीका केली आहे. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारला एक विनंती आहे. घडलेली घटना लपवण्या दाबण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती वापरणे निष्फळ आहे. महामारी रोखण्यासाठी योग्य पावलं उचला, जीव वाचवा आणि प्रादुर्भाव रोखा. हीच काळाची गरज आहे, असे ट्विट केले.
लखनौमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून उत्तर प्रदेश सरकारने रात्रीची संचारबंदी सारखे नवे निर्बंध लादले आहेत. लखनौमध्ये सध्या ३१ हजारापेक्षा जास्त सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. ही रुग्णसंख्या दोन आठवड्यापूर्वीच्या संख्येपेक्षा तब्बल १0 पट आहे. काल उत्तर प्रदेशात नवे २0 हजार ५१0 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समावेश आहे.