उपासमारीने नव्हे कोरानाने गेला दोघांचा जीव

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8265*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

187

उपासमारीने नव्हे कोरानाने गेला दोघांचा जीव

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,चंद्रपूर : शहरातील नेहरू चौकातील जुन्या विजय टुरिंग टॉकीज परिसरात एक दुदैर्वी घटना उजेडात आली. कधी काळी फळांचा व्यवसाय करणार्‍या द्रोपदाबाई खोब्रागडे (वय ८५) व यात हातभार लावणारा त्याचा दिव्यांग मुलगा अंकुश खोब्रागडे (वय ५५) या दोघांचे कुजलेले मृतदेह बेवारस स्थितीत त्याच्या पडक्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्रथमदश्री लॉकडाउनच्या काळात खायला न मिळाल्याने आई व मुलाने जगाचा निरोप घेतला असे निदर्शनास येत असताना, शवविच्छेदनापूर्वी उपजिल्हा रुग्णालयाकडून केलेल्या अँन्टिजन तपासणी नंतर त्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे निष्पन्न झाले. शासकीय पद्धतीने वणी रोडवरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी पार पडला. एकमेकांच्या आधाराने राहणार्‍या मायलेकाच्या या दुर्दवी मृत्यूवर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, नेहरू चौकातील जुनी विजय टुरिंग टॉकीज जवळपास ४0 वर्षांपूर्वी बंद झाली. पण तिथे काम करणारे जगदीश खोब्रागडे आपली पत्नी द्रोपदाबाई व चार मुले (त्यातील एक मुलगा दिव्यांग) व एक मुलीसह टुरिंग टॉकीजचे बाजूला त्यांना दिलेल्या घरात राहत होते. पतीच्या मृत्यूनंतर फळाचा व्यवसाय करून द्रोपदीबाई व अंकुश उदरनिर्वाह चालवत होत्या. द्रोपदीबाईच्या चार मुलांपैकी एक मुलगा मुंबईला राहतो. सुशील नावाच्या विवाहित मुलाने जवळपास ३ वर्षांपूर्वी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली होती. तिसर्‍या मुलाच्या पत्नीचे आई सोबत न पटल्याने ती बाजूलाच वेगळी राहत होती. चौथा जन्मजात दिव्यांग अंकुश आई सोबतच राहून तिला मदत करायचा. आई अंथरुणाला खिळून असताना तिची सर्व जबाबदारी अंकुशच उचलत होता. आईच्या नावाने असलेली एक जागा मागे काही वर्षांपूर्वी विकल्या गेली. ती राशी मुंबईत राहणार्‍या मुलाला दिल्याने त्या पैशावरून परिवारातील काही सदस्य नाराज असल्याचे बोलले जाते. मुंबईत राहणार्‍या मुलाने आई व दिव्यांग भावासाठी घराजवळील मेसमध्ये दोन्ही वेळेच्या जेवणाच्या डब्ब्याची सोय केली होती. त्यामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या आई व दिव्यांग भावावर उपासमारीची पाळी आली नाही. मात्र तब्बल तीन दिवसांपासून खोब्रागडे कुटुंबीयातील कोणीच डब्ब्यासाठी न आल्याने काही अनुचित तर घडले नाही. यासाठी मेस वाल्याने एका व्यक्तिला घराकडे पाठविले असता घरातून दुर्गंध येत असल्याचे कळले. पोलिसांना याबाबत सूचना देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना कुजलेल्या अवस्थेत दोन शव तीथे पडून दिसले. पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले व तपास सुरू केला.