Home Breaking News सीबीआयकडून ११ तास चौकशी;अनिल देशमुखांनी फेटाळले आरोप

सीबीआयकडून ११ तास चौकशी;अनिल देशमुखांनी फेटाळले आरोप

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8249*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

107 views
0

सीबीआयकडून ११ तास चौकशी;अनिल देशमुखांनी फेटाळले आरोप

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था/मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या १00 कोटी वसुलीच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयकडून ११ तास चौकशी करण्यात आली. चौकशीत अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे.
अनिल देशमुख सीबीआय चौकशीला हजर झाले आहे. ११ तास अनिल देशमुख यांची चौकशी केली. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
आपल्यावरील लावण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन आणि चुकीचे असल्याचा देशमुखांनी दावा केला आहे. महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा काही अधिका-यांचा हा प्रयत्न आहे, असा आरोपही देशमुख यांनी केली.
सीबीआयच्या अधिका-यांनी सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल अनेक प्रश्न विचारले. पण मला माहित नाही, माझा काहीही संबंध नाही अशी उत्तर अनिल देशमुख यांनी दिली. मुंबई स्फोटकांनी गाडी सापडली या प्रकरणानंतर परमबीर सिंग यांची बदली केल्याने त्यांनी पत्र लिहले आहे.
कारमायकल रोड गाडी प्रकरणीने केलेल्या तपासानुसार परमबीर सिंग यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. डीसीपी राजू भूजबळ आणि एसीपी संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबात स्पष्ट केले. मी त्यांना कोणतीही वसुली करायला सांगितले नाही, असेही देशमुख यांनी सांगितले आहे.