
गणेश यागाचे विधवत कार्य यूसीएन चॅनेल वर 16 एप्रिल रोजी सकाळी साडे दहा ते अडीच वाजेपर्यंत
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : श्री गणेश मंदिर टेकडी स्टेशन रोड सिताबर्डी नागपुर यांच्या वतीने सूचना जाहीर केली आहे की , भारतात व पूर्ण विश्वाभर कोरोनाचे संकट लक्षात घेता विश्वशांतीसाठी या महामारी पासून मुक्ती करण्याकरिता संस्थेतर्फे व काही गणेश भक्तांच्या विनंतीच्या भावना लक्षात घेता मंदिर कार्यकारणी तर्फे 16 एप्रिल शुक्रवारी सकाळी साडे दहा ते अडीच वाजेपर्यंत गणेश यागाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार गणेश यागाचे विधवत कार्य करून “श्री “ना साकडे घालून प्रार्थना करण्यात येत आहे. जगावरचे कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर करावे व दूर व्हावे याकरिता कार्यक्रमाचे व आरतीचे प्रसारण श्रीचे मुखदर्शन यूसीएन चॅनेल द्वारे दाखविण्यात येईल. भक्तांनी याचा घरी बसून लाभ घ्यावा अशी विनंती सचिव संजय जोगळेकर यांनी केलेली आहे.

