Home नागपूर समाजवादी पार्टी व भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

समाजवादी पार्टी व भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

0
समाजवादी पार्टी व भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

समाजवादी पार्टी व भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त समाजवादी पाटीर्चे नागपूर जिल्हाध्यक्ष रविकांत खोब्रागडे यांच्या अध्यक्षेतेत डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव एजाज खाँन यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. व अन्य कार्यकर्ते सहभागी होते.
भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्ताने भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नागपूर महानगर तर्फे संविधान चौक नागपुर स्तिथ असलेल्या पुज्यनीय बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नागपुर शहर अध्यक्ष रविंद्रजी पेंदाम, सामाजिक कार्यकर्ते विनोद मसराम, पश्चिम नागपुर अध्यक्ष आकाश मडावी, दक्षिण-पश्चिम अध्यक्ष स्वप्निल वलके, उत्तर नागपुर अध्यक्ष शिवराम वाढवे, सामाजिक कार्यकर्ता मोनु धुर्वे, विजय मरकाम, गीताताई उईके, आदींची उपस्थीती होती.