
डॉ. हेमंत पानतावणे यांचे कोरोनाने निधन
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,भिवापूर : भिवापूर येथील डॉ. हेमंत पानतावणे (वय ३८) हे मंगळवारी (१३ एप्रिल) कोरोनाचा बळी ठरलेत. नागपूर येथे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. कोरोनाचे निदान झाल्याने गत रविवारी पानतावणे उपचारासाठी नागपूरच्या भांडे प्लाट येथील ग्रेसीयस हॉस्पिटलमध्ये भरती होते. प्रकृती खालावल्याने मंगळवारी दुपारी त्यांचे निधन झाले. स्थानिक सुसुंद्री परिसरातील निवासी डॉ. हेमंत हे उमरेड येथील खासगी रुग्णालयात पॅ्रक्टीस करीत होते. निलज फाटा (ता. पवनी) येथे ते स्वताचा दवाखानासुद्धा चालवित. अत्यंत मनमिळावू व सुस्वाभावी असलेल्या हेमंतच्या मृत्युबद्दल येथे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आमदार राजू पारवेंसह शहरातील अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

