प्रबोधनकार कलावंतांना दरमहा दहा हजार रुपये मासिक मानधन द्या

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8204*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

188

प्रबोधनकार कलावंतांना दरमहा दहा हजार रुपये मासिक मानधन द्या

-सरकारला कलावंतांची मागणी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघाच्या वतीने आज पत्रपरिषद मध्ये मुख्यमंत्री/ सांस्कृतिक मंत्री /समाज कल्याण व सामाजिक न्यायमंत्री, या सर्व महाराष्ट्र जिल्हा व जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना विनंती निवेदन सादर करीत प्रबोधनकार कलावंतांना दरमहा दहा हजार रुपये मासिक मानधन देण्याची मागण करण्यात आली आहे.
कलावंतांचे म्हणणे आहे कि आम्ही फक्त कलेच्या भरोशावर परिवाराचा उदरनिर्वाह करतो. 2020 पासून कार्यक्रमाची वेळ आली की आपण कोरोनाच्या संक्रमणाच्या कारणाने लॉकडाऊन करता? आमच्या घरी जे काही होते ते सर्व संपले. उदरनिर्वाहला आवश्यक वस्तू आम्ही गहाण ठेवून / विकून गुजरान केली. आता तर उपासमारीची वेळ आमच्यावर आली. आपण आम्हा कलावंतांना दरमहा दहा हजार रुपये मासिक मानधन लॉकडाउन असेपर्यंत द्यावे अशी मागणी केली आहे. आॅनलाइन कार्यक्रम तिन्ही विभागाच्या पॅकेजमधून करून आम्हाला आर्थिक सहाय्य करावे आम्ही निरुपद्रवी कलावंत प्रत्यक्ष समाजात जाऊन कार्यक्रम करतो. प्रबोधन करतो. शासनाचे राष्ट्रीय धोरण कलेच्या कलापथकाच्या माध्यमाने आमच्याच कार्यक्रमाने लोक गोळा करण्याचे काम करतो. आपले सर्वच सभा संमेलन चालू आहेत मग आमचे कार्यक्रम बंद का ? असा आमचा प्रश्न आहे ? फक्त आमच्या कार्यक्रमामुळे कोरोना संक्रमण वाढते काय आमचा प्रश्न आहे. तीनही विभागाचे सांस्कृतिक / सामाजिक / क्रीडा या आर्थिक पॅकेज मधून आम्हाला आपण सहकार्य करावे अशी कलावंतांनी मागणी केली आहे. याप्रसंगी पत्रपरिषद संबोधित करतेवेळी प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध शेवाळे, सचिव सुभाष कोठारे, कन्हैया दादा मेश्राम आणि राजू गोदळे यांची उपस्थिती होती.