Home नागपूर जेष्ठ पत्रकार भोलासिंग राठोड यांचे निधन

जेष्ठ पत्रकार भोलासिंग राठोड यांचे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8199*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

148 views
0

जेष्ठ पत्रकार भोलासिंग राठोड यांचे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : दक्षिण नागपूरातील पार्वती नगर येथील रहिवासी ज्येष्ठ पत्रकार भोलासिंग जीवनसिंग राठोड यांचे मंगळवारी पहाटे कोरोनाने निधन झाले. ते मृत्युसमयी 64 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित कन्या व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल प्रेस क्लब, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि टिळक पत्रकार भवनचे पदाधिकारी अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, शिरीष बोरकर, ब्रह्माशंकर त्रिपाठी, विश्वास इंदूरकर, जोसेफ राव आणि राहुल पांडे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मानेवाडा घाट येथे अंतिम संस्कार करण्यात आले.