भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नागपुर शहर मंडल अध्यक्ष यांची कार्यकारणी गठीत

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8187*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

302

भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नागपुर शहर मंडल अध्यक्ष यांची कार्यकारणी गठीत

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नागपूर महानगर यांच्यावतीने नुकत्याच झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाची आदिवासी आघाडी नागपुर शहराच्या सर्व मंडल अध्यक्षांची कार्यकारणी भाजपा आदिवासी आघाडी शहर अध्यक्ष रवींद्र पेंदाम यांच्या मार्गदर्शनात गठीत करण्यात आली. आदिवासी समाजाच्या ज्वलंत समस्या, अडचणी, सोडविण्याकरिता तसेच सामाजिक, शैक्षणीक, आर्थिक योजनांच्या लाभ आदिवासी समाज बांधवांना मिळवून देण्याकरिता ही कार्यकारणी गठीत करण्यात आली. भाजप आदिवासी आघाडी नागपूर महानगरच्या पश्चिम नागपूर अध्यक्षपदी आकाश मडावी, दक्षिण-पश्चिम अध्यक्ष स्वप्निल वलके, उत्तर नागपूर अध्यक्ष शिवराम वाढवे, मध्य नागपूर अध्यक्ष चंदा कोडापे, पूर्व नागपुर अध्यक्ष विनायक ऊईके, दक्षिण नागपूर अध्यक्ष विजय मरापे या सर्वांची नियुक्ती राष्ट्रीय महामंत्री आदिवासी आघाडी तथा खासदार गडचिरोली अशोक नेते यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देवून सर्वांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपा नागपूर शहर अध्यक्ष तथा आमदार प्रवीण दटके तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर मायाताई ईवनाते, महामंत्री रामभाऊ आंबुलकर, संघटन महामंत्री सुनील मित्रा, भाजपा नागपूर शहर उपाध्यक्ष विवेक नागभिरे, आदिवासी आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राजे वीरेन्द्र शाह ऊईके, प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गेडाम, प्रसिद्धी प्रमुख अक्षय उईके, नगर सेवक गोपिचंद कुमरे तसेच सर्व आदिवासी नगरसेवक व आदिवासी आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली. असे रवींद्र पेंदाम अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नागपूर महानगर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून म्हटले आहे.