ऋणानुबंधाच्या सुटल्या गाठी- सौ. वंदना प्रकाश चावके 

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8183*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

205

ऋणानुबंधाच्या सुटल्या गाठी

प्रस्तुत कथा काल्पनीक नसून सत्यघटना आहे. ही कथा माझ्या आते सासूची आहे. लोहारी-सावंगा या छोट्याशा गावात राहणारी ‘जनाबाई गाडगे’ असं नाव. पती-पत्नी दोघेही आनंदात राहत होते. त्यांना स्वत:चं मुलं-बाळं नव्हतं. दोघेही धार्मिक कार्यक्रम गावात करत असत. गावातील लोकांचा त्यासाठी त्यांना भरपूर प्रतिसाद मिळत होता. एके दिवशी त्यांच्या शेजारच्या मुलाची आई वारल्यामुळे त्यांनी त्या मुलाचं बरंच केलं व एकाला दत्तक घेतलं. पुढे शिक्षण झाल्यानंतर लग्न झालं पण दोघांचं न पटल्यामुळे  त्याची बायको माहेरी निघून गेली. काही वर्षानंतर दुसरं लग्न झालं. दूसरी बायको नोकरीची. नागपूर कोर्टातील स्टेनो होती. तिचं पण दूसरं लग्न व एक मुलगा अशी परिस्थिती होती. काही दिवस सुरळीत गेले. आत्या गावाला व हे दोघे इथे आनंदात होते. काही दिवस सुरळीत गेले. पुढे त्याला आणख एक मुलगा झाला व या दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यासाठी आत्याला घरदार विकून नागपूरमध्ये घेउऊन आले. त्यांनी इथे घर घेतले व आनंदात राहू लागले. कारण त्यावेळी लहान मुलासाठी त्यांना आत्याची खूप गरज होती. पुढे मुले मोठे झाल्यावर सुनेला आणि पहिल्या मुलाला ही म्हातारी जड होउऊ लागली. तिला काही काही बोलून शेवटी एक दिवस रात्री अकरा वाजता या म्हातारीला तिच्या कपड्याचे गाठोळे बांधून माझ्या ननंदेकडे आणून दिलं.माझ्या ननंदेपेक्षा आमचं रक्ताचं नातं जास्त. कारण त्या माझ्या सास-याची सख्खी बहीण. तिचे जवळपास नातेवाईक नसते तर या लोकांनी म्हातारीला रस्त्यावर काढलं असतं. तिला जर एक पोटची मुलगी जरी असती तरी तिने चांगल्या त-हेने आत्याचा सांभाळ केला असता. आमच्याशी घट्ट नाते असल्यामुळे आम्ही त्यांना घरी आणले. कधी आमच्याकडे तर कधी ननंदेकडे असं करता करता त्यांचे चार-पाच वर्ष निघून गेले. पण या चार-पाच वर्षात एकही दिवस तो मुलगा ज्याला दत्तक घेऊन आपलं घर विकून, पैसे देऊन,त्याचं सर्व करून त्याला कधी या उपकारांची जाणीव झाली नाही किंवा एकही दिवस तो बायकोच्या आडून या म्हातारीला भेटायला आला नाही. आधारकार्डसाठी कितीतरी वेळा फोन करूनही त्यांचं आधारकार्ड सुद्धा देत नाही. ही आहे आजच्या बिना माणूसकीची रीत.
सर्व नात्यांपेक्षा माणूसकीचं नातं सर्वश्रेष्ठ पण आज तेच नातं सर्वजण विसरलेले आहे. एक स्त्री दुस-या स्त्री ची दुश्मन म्हणून घराघरात कार्यरत आहे. व या गोष्टींनी, अशा घटनांनी कुटुंबसंख्या भंगलेली आहे. आज आमच्या आत्या मरणाच्या दारात आहे. त्यांचा एक हात व एक पाय काम करीत नाही. त्यांची सर्व कार्य त्यांना उचलून करावी लागतात. पण या सर्व गोष्टींसाठी आम्ही समर्थ आहोत. कारण, आम्हाला परमेश्वरांनी आम्हाला यातून शिकण्यासाठी किंवा आमच्या हातून सेवा करून घेण्यासाठी संधी प्राप्त करून दिली आहे. माझ्या लिहिण्यामागचा एकच उद्देश्य आहे की, माणूसकीचं नातं सर्वांनी घराघरात जपावं. आधीच कोरोनाने बाहेरचं वातावरण खराब करून टाकलेलं आहे. पण, घराघरांतील वातावरण टिकविण्यासाठी माणूसकीची व सदविचारांची गुढी येणा-या गुढीपाडव्याला उभारावी. कचाचित, येणारं नवीन वर्ष गुढीपाडवा संकटरहित राहील.

– सौ. वंदना प्रकाश चावके

पारधीनगर, नागपूर
मो. 9403641651