Home Breaking News इतवारी-उमरेड-भिवापूर-नागभीड ब्रॉडगेज लाईनच्या कामाला गती द्या

इतवारी-उमरेड-भिवापूर-नागभीड ब्रॉडगेज लाईनच्या कामाला गती द्या

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8163*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

271 views
0

इतवारी-उमरेड-भिवापूर-नागभीड ब्रॉडगेज लाईनच्या कामाला गती द्या

-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमदार राजू पारवेंची मागणी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-उपरेड : उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांनी रविवारी (११ एप्रिल) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट देऊन निवेदनाद्वारे इतवारी-उमरेड-भिवापूर-नागभीड ब्रॉडगेज लाईनचे संतगतीने चाललेल्या कामाला गती देण्यात यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. ना. गडकरी यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर-नागभीड नॅरोगेज रेल्वे मार्ग इंग्रजांच्या काळात तयार करण्यात आला होता. तेव्हा गावे लहान होती. आता या गावांची लोकसंख्या वाढली आहे. कामानिमित्त, नोकरी व व्यवसायानिमित्त रेल्वेने प्रवास करणा-यांची संख्याही मोठया प्रमाणात वाढली आहे. नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेज झाल्यास या परिसरातील ग्रामीण भागांचा विकास होईल. उमरेड येथे कोळसा खाणी असल्याने मालगाड्या आणि एक्सप्रेस सुरू होईल. त्यामुळे रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. नागपूर-नागभीड रेल्वे सहा ते सात डब्याची असते. प्रवास करणा-यांची संख्या भरपूर राहात असल्याने प्रत्येक डब्यामध्ये प्रवाशांची गर्दी असते. या मार्गाचे ‘ब्रॉडगेज’मध्ये रूपांतर झाल्यास तसेच प्रवास करण्यास कमी वेळ लागणार असल्याने नागरिकांचे कामेही लवकर होतील. याकरिता संतगतीने चाललेल्या कामाला गती देण्याची नितांत गरज असल्याची आमदार राजू पारवे यांनी ना. गडकरी यांना विनंती केली.
यासह उमरेड-भिवापूर- नागभीड या उर्वरित रस्त्याचे चार लेन रास्ता व्हावा, याबाबत चर्चा केली असता यावर्षीच प्रस्ताव तयार करण्यास संबंधित अधिका-यांना सांगितले व लवकरच हा सुद्धा रस्ता मंजूर करण्यात येईल तसेच उमरेड विधानसभा क्षेत्रातील एमआयडीसीमध्ये लघु व मध्यम उद्योग आणण्याबाबतसुद्धा चर्चा करण्यात आली. तसेच वरील सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लागतील, असे आश्?वासन ना. नितीन गडकरी यांनी दिल्याचे आमदार राजू पारवे यांनी सांगितले.