कुही तालुक्यात हरदोली राजा ठरले कोरोना हॉटस्पॉट

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8159*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

270

कुही तालुक्यात हरदोली राजा ठरले कोरोना हॉटस्पॉट

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-कुही : हरदोली राजा हे गाव मांढळ नगरीच्या दक्षिणेस चार किमी अंतरावर आहे. या गावचा संपूर्ण व्यवहार हा मांढळ नगरीशी होतो. या गावात २५00 च्या जवळपास लोकसंख्या आहे. चारशे घरांच्या लोकवस्तीत आज प्रत्येक घरी कोरोनाचे रुग्ण असल्यासारखे आहे. त्यामुळे हे गाव कोरोना हाटस्पॉट ठरले असून, प्रतिबंधित क्षेत्र म्हणून संपूर्ण गाव घोषित केले आहे. गावात सॅनिटायझरची फवारणी करून गाव निजंर्तुकीकरण करण्यात येत आहे. रुग्णांची योग्यप्रकारे काळजी घेऊन त्यांचे उपचार सुरू आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या हरदोली गावाला कुहीच्या उपविभागीय अधिकारी पर्वणी हर्षा पाटील यांनी नुकतीच भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.
तालुक्यात दररोज शंभरपेक्षा जास्त रुग्ण नव्याने आढळून येत असून, मृत्युचेही प्रमाण वाढले आहे. तालुक्यात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली आहे. यात लोकप्रतिनिधी, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते आपापल्या स्तरावर प्रयत्न करीत आहेत. विविध राजकीय पक्षाचे ४५ वर्षांवरील नेते व कार्यकर्ते स्वत: लस घेतानाचा फोटो समाजमाध्यमावर शेअर करीत सर्व ४५ वर्षांवरील नागरिकांना स्वयंस्फूतीर्ने लस घेण्याचे आवाहन करीत आहेत. त्याला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. कारण, दररोज तालुक्यात सुमारे १५00 पेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे. मांढळ ग्रामपंचायतने पुन्हा आठ दिवसांसाठी कडक लाकडाऊनचा निर्णय घेऊन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण आज मांढळ नगरीत घरोघरी बाधितांची संख्या दिसत आहे. तसेच वेलतुर, सोनपुरी, हरदोली नाईक येथील ग्रामपंचायतने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
तालुक्यात प्रभारी तहसीलदार रमेश पागोटे, गटविकास अधीकारी मनोज हिरूडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय निकम, कुहीचे ठाणेदार चंद्रकांत मदने, वेलतुरचे ठाणेदार आनंद कविराज, नगरपंचायत कुहीचे देवाजी सडमेक, सुहास मिसाळ यांच्यासह मंडळ अधिकारी हिंदलाल उके, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, ग्राम रोजगार सेवक, आशा वर्कर, आरोग्य अधिकारी व कर्मचारी लसीकरण टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु, आता लसीचा तुटवडा सुरू झाल्याने लसीकरण केंद्र बंद पडले आहेत.