रुग्णालयातील भोंगळ कारभार थांबेना, विद्युत पुरवठा खंडित झाल्याने दोन रुग्णांच्या मृत्यूची चर्चा

312

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर – दोन दिवसांपूर्वीच नागपूर येथील वाडी परिसरातील वेल स्ट्रीट हॉस्पिटल येथे लागलेल्या आगीत चार रुग्णांचा मृत्यू झाला अशातच पुन्हा एकदा नागपूर शहर हादरले सदर परिसरातील बैरामजी टाउन येथील वीनस क्रिटिकल केअर हॉस्पिटल येथे आज सायंकाळच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची चर्चाचा आहे यावेळी मृतकांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केली तर डॉक्टरांशी व रुग्णालय कर्मचाऱ्यांशी हातापाई झाली असल्याची माहितीही पुढे येत आहे. नागपूर शहरात कोरोना रुग्णाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना जागाही उपलब्ध होत नाही आहे तर दुसरीकडे रेमदेसिविर या इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना नागपूर शहरात ससेहोलपट करावी लागत आहे. आता या घटनेने पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेवर व प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.