
खाजगी रुग्णालयाचा अक्षम्य भोंगळ कारभार
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : काशीनगर परिसरात राहणा-्या आशाबाई चंद्रभान मुन (63) यांना कोविड असल्याने शुक्रवारी आय. जी. पी. ए हॉस्पिटल रिसर्च सेंटर, जामठा वर्धा येथे कुटुंबीयांनी भरती केले होते. आज सकाळी रुग्णालयातून मुन परिवाराला फोन आला आणि सांगण्यात आले की आशाबाई यांचे निधन झाले. घरच्यांनी रुग्णालयात धाव घेतली. आणि मृतदेह व मृत्य प्रमाणपत्र घरच्यांना दिले. दरम्यान घरच्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. तसेच घरी मंडपही टाकले. काही वेळानी रुग्णालय प्रशासनानेच आशाबाई यांचे निधन झाले नाही असे नातेवाईकांना सांगितले. यामुळे नातेवाईक संतप्त झाले. आशाबाई याना घरच्यांनी तात्काळ दुस-या रुग्णालयात हलविले.

