केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपुरातील रेमडेसिवीरचा तुटवडा येणार संपुष्टात

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8143*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

331

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपुरातील रेमडेसिवीरचा तुटवडा येणार संपुष्टात

-सन फार्मामार्फत १0 हजार डोजेस येणार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : नागपूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाचे तांडव सुरू आहे. दिवसाआड रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून, आता गंभीर संवगार्तील रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काहीप्रमाणात तुटवडा नागपुरात दिसून येत आहे. परंतु आता ही असलेली रेमडेसिवीरची टंचाई लवकरच संपुष्टात येणार असून, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन सन फामार्मार्फत नागपूरसाठी लवकरच १0 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचे डोसेस उपलब्ध होणार आहे.
नागपुरात रेमडेसिवीरचा तुटवडा लक्षात घेता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रेमडेसिवीर उत्पादक सन फार्मा कंपनीचे मालक दिलीप सांघवी यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे केले आणि नागपुरात निर्माण झालेली परिस्थिती त्यांना सांगून रेमडेसिवीर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले.
यावेळी सांघवी यांनी गडकरी यांच्या आवाहानाला त्वरित प्रतिसाद दिला असून, आजच्या आज ५ हजार डोजेस नागपुरात उपलब्ध करून देण्याचे आश्?वासन दिले. तर उर्वरित ५ हजार डोजेस येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पाठविण्यात येईल, असेही सांघवी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता नागपुरात कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रेमडेसिवीरचा तुटवडा आता संपुष्टात येणार असून, यामुळे काही प्रमाणात होणा-या मृत्यूंच्या संख्येतही घट होऊ शकते, असे वैद्यकीय जाणकारांचे म्हणणे आहे.