लाच घेताना पालिकेचा कर्मचा-याला रंगेहाथ पकडले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8137*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

199

लाच घेताना पालिकेचा कर्मचा-याला रंगेहाथ पकडले

-विवाह नोंदणीसाठी मागीतले ४,५00 रुपये

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : महापालिकेचा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. विवाह नोंदणीकरिता या कर्मचा-याने ४ हजार ५00 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या कर्मचा-यांनी त्यांना रंगेहात अटक केली. रामचंद्र बिंदा महतो (वय ४९) असे या लाचखोर मनपा कर्मचा-याचे नाव आहे.
या प्रकरणी गड्डीगोदाम येथील रहिवासी तक्रारदार हे स्विगी कंपनीत डिलीव्हरी बॉयचे काम करतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचे लग्न झाले. विवाहाची कायदेशीर विवाह नोंदणी करणे आवश्यक असल्याने त्याला त्यांच्या मित्राने मंगळवारी झोन कार्यालयातील विवाह नोंदणी कर्मचारी रामचंद्र महतो याच्याशी भेट घालून दिली. तक्रारदाराने महतो याच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता आवश्यक कागदपत्रांची यादी, विवाह नोंदणी फॉर्म आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती द्यावी लागेल. तसेच विवाह नोंदणीच्या कामासाठी ५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. शिवाय, पैसे असल्यास यायचे अन्यथा माज्याकडे यायचे नाही, असेही बजावले. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या प्राप्त तक्रारीवरून पोलिस उपअधीक्षक नरेश पारवे यांनी गोपनीय चौकशी केली असता महतोने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शनिवारी सदर येथील मनपा दवाखान्याबाहेर सापळा रचला. तडजोड केल्यानंतर महतोने साडेचार हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. याप्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून महतोला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि अप्पर अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.