पवित्र नात्याला फासळे काळे, बापाचे मुलीशी अश्लील चाळे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8124*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

218

पवित्र नात्याला फासळे काळे, बापाचे मुलीशी अश्लील चाळे

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,चंद्रपूर : वडील व मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना चंद्रपूर येथे उघडकीस आली असून आपल्याच १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात आरोपी नराधम वडिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर येथे वास्तव्यास असणा-या ६ व्या वगार्तील एका १३ वर्षीय मुलीने आपल्याच वडिलांविरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात दाखल केली असून मन सुन्न करणाया या घटनेतील आरोपी वडील पोलिसांच्या ताब्यात आहे. घटनेतील पीडित मुलगी ही आरोपीची सख्खी मुलगी असून आई कामावर गेल्यानंतर भावाला काहीतरी कारणाने बाहेर पाठवून नराधम वडील आपल्याच मुलीसोबत ईल लैंगिक चाळे करत असल्याची धक्कादायक घटना मुलीने हिंमत केल्याने अखेरीस उघडकीस आली.
चंद्रपूर येथिल प्रसिद्ध समाजसेविका तसेच फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपच्या अध्यक्षा सरिता मालू यांना घटनेची माहिती मिळताच गुरुवारी त्यांनी पीडित मुलीचे घर गाठून मुलीची सविस्तर चौकशी करून तिला तक्रार दाखल करण्यास मार्गदर्शन केले. शेवटी मुलीने आपली संपूर्ण हिंमत एकवटून नराधम पित्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
मुलीच्या सांगण्यानुसार आई घरी नसताना तिचे वडील काही ना काही बहाण्याने वारंवार तिच्या छातीला, गुप्तांगांना तसेच पार्श्वभागाला वाईट हेतूने स्पर्श करत होते. त्याचप्रमाणे मुलगी आंघोळीला गेली असता चोरून लपून तिला बघत होता. ही बाब मुलीच्या लक्षात आल्याने तिने वडिलांपासून अंतर राखणे सुरू केले असता आईला काही सांगितल्यास अथवा विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची तक्रार मिळताच रामनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी नराधम वडिलांना अटक केली असून आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ अ, ३५४ सी, ३२३, ५0६, बालकांचे लैंगिक अत्याचार विरोधी कायदा (पोक्सो) नुसार कलम ८, ९(ठ) तसेच कलम १0 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.