Home नागपूर मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..हर फिक्र को धुएं में उडाता...

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..हर फिक्र को धुएं में उडाता चला गया…

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8110*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

204 views
0

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..हर फिक्र को धुएं में उडाता चला गया…

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : भल्याभल्यांना साध्य होत नसलेली देशातील सर्वोच्च परीक्षा यूपीएससी होय. ही परीक्षा पास करायची या बेताने अभ्यास करताना घरची हलाखीची परिस्थिती आड येऊ दिली नाही. आणि परीक्षा तितक्याच दिमाखात पास करून दाखविली. मात्र, मुलाखतीत सात गुणांनी प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न भंग पावले. परत तितक्याच जोमाने परीक्षा द्यावी तर म्हातारे आई-वडील, भावाच्या जबाबदारीने कुटुंबाचा गाडा हाती घ्यावा लागला. त्याने आपल्या बळावर ब-यापैकी जम बसविला होता. मात्र, कोराना लाटेने त्याचे नुकते कंबरडेच मोडले नाही. तर परिस्थितीसमोर हार न मानणा-या मसलीच्या मनीषला कोरोनासमोर मात्र जीव गमवावा लागला.
काटोल तालुक्यातील मसली रहिवासी तथा लखोटिया भुतडा कॉन्व्हेंट, कोंढाळी येथील शिक्षक मनीष उर्फ सोनू बाबाराव क्षीरसागर (वय २२) यांचे नागपूर येथे उपचारादरम्यान रविवारी (६ एप्रिल) कोरोना आजाराने निधन झाले. अत्यंत हुशार यूपीएससीची परीक्षा पास झालेला. पण, मुलाखतीमध्ये सात गुणाने नोकरीला मुकावे लागले होते. यानंतर हिंमत न हारता कळमेश्वर येथे कॅफे सेंटर सुरू केले. सोबत कोंढाळी येथे शिक्षक म्हणून कार्य करीत होते. आर्थिकदृष्टया स्थिरावल्यावर दोन वर्षांपूवी विवाहाचा निर्णय घेतला. त्यांच्या सुखी संसारात एका गोंडस मुलीचे आगमन आठ महिन्यांपूर्वी झाले होते. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून कॉन्व्हेंट बंद आहे. तसेच लॉकडॉऊनमुळे कधी सुरू तर कधी बंद राहणा-या कॅफे सेंटरवर घर खर्च चालवू न शकल्याने आर्थिक अडचणीतून त्यांनी आपले शिक्षण व गुणवत्तेचा विचार न करता भाजीपाला विकायला सुरुवात केली होती. काही दिवसांपूवी आजारी पडल्याने अगोदर गावी उपचार घेतले. कोरोनाची तपासणी केली असता पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रकृती अधिकच गंभीर होत चालली होती. म्हणून उपचाराकरिता नागपूरला हलविण्यात आले. भाजीपाला विकताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असा अंदाज आहे. अत्यंत हुशार, कर्तबगार शिक्षकाची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या अशा अवेळी गेल्याने वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी यांचा आधार गेला. तर आठ महिन्यांची चिमुकली वडिलांच्या प्रेमाला पोरकी झाली. मसली येथे त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. निधनानंतर त्यांच्या आप्तस्वकियांना नागपूरला बोलावून ओळख पटवून शासन स्तरावर अंत्यसंस्कार करण्यात आले…तेव्हा वातावरणात कदाचित हे गीत निनादत असेल…मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..हर फिक्र को धुएं में उडाता चला गया…