चारित्र्यावर घेतला आळ,पत्नी ठरली काळ

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8105*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

207

चारित्र्यावर घेतला आळ,पत्नी ठरली काळ

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,जळगाव : चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून पत्नीने पतीची हत्या केली. जामनेर तालुक्यातील गोनखेड येथे रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना आहे. दिलीप विश्वनाथ सोनवणे असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी संगीता दिलीप सोनवणे हिला ताब्यात घेतले आहे.
जामनेर तालुक्यातील गोनखेड येथील दिलीप सोनवणे व त्याची पत्नी संगीता यांनी पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. दिलीप हे नेहमी पत्नीवर संशय घेत असल्याने त्यांच्यात नेहमी भांडणे व्हायची. मंगळवारी पती दिलीप मद्यप्राशन करून घरी आला. त्यांच्यात संशयावरून पुन्हा वाद सुरू झाला. काही वेळाने वाद मिटल्यानंतर दिलीप हे झोपल्याचा फायदा घेत पत्नी संगीताने त्यांच्या गळ्याला दोरी बांधत गळफास देउन हत्या केली.
दरम्यान, हा सर्व प्रकार सोनवणे यांच्या पाच वर्षीय मुलासमोर घडला होता. मुलाने चाौकशीसाठी आलेल्या पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. यानंतर आरोपी संगीता सोनवणे हिने खुनाची कबुली दिली. संगीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिलीप सोनवणे यांची बहीण कल्पना जाधव यांनी दिलेल्या फियार्दीवरून जामनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास डीवायएसपी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहेत