बेसा येथील मुख्य आरोपी मुकुंद शामलाल घाटे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8096*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

174

बेसा येथील मुख्य आरोपी मुकुंद शामलाल घाटे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपू : मौजा बेसा येथील घाटे यांच्या मालकीची शेती ९ एकर होती. त्यातील ५ एकर शेत क्राऊन को-आॅप हौसिंग सोसायटी आणि ४ एकर शेत मिलिंद को-आॅप हौसिंग सोसायटी या दोघांना विकली. व सोसायटीच्या त्यावेळेसच्या अध्यक्ष आणि सचिव यांना सोबत घेऊन संगणमत करून वेळोवेळी वेगवेगळे नकाशे तयार करून एकच प्लॉट दोन दोन प्लॉट धारकांना विक्री करून लाखोंची माया जमविली. मुकुंद शामलाल घाटे हे गृहस्थ बर्डी परिसरातील राहत असून त्याने आपल्या मित्रमंडळीत व नातेवाईकांना, ओळखीच्या लोकांना, बोगस प्लॉट विकून या लोकांची फसवणूक केली आहे. १९८६ – १९८७ खसरा क्र. ४/१ हा बदलून ४२ झाला. पण मुकुंद शामलाल घाटे यांनी प्लॉट धारकांच्या रजिस्ट्रीवर 4 /1 दाखवून अनेक प्रकारची फसवणूक केली आहे. हे षडयंत्र मुकुंद घाटे यांनी केल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले असून दोन सोसायट्यांना भुखंड विकून जिल्हा संत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत मुकुंद शामलाल घाटे यांच्यावर धारा 420 / 467 468 /471 आणि 34 अन्वये पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलतरोडी पोलिस ठाणेदार विजय आकोत यांनी आरोपीला अजून पर्यन्त अटक केली नाही.आरोपी मोकळे फीरत आहे.तसेच त्यांना मदत करणा-या दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी असे राहुल गजानन राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.