
अजय बिवडे, विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – मागील वर्षभरापासून राज्यात कोरोनाचे सावट अधिकच गडद होत चाललेले आहे़ कधी संपेल हा कोरोना, व मिळेल सुटका असा त्राग मनात धरणारी जनता आर्थिक संकटातही सापडलेली आहे़ कोरोना झाला की सरसकट दोन-चार लाखांचा आर्थिक भुर्दंड पडतो़ मग सरकारला रुग्णालयांसाठी कितीही आँडिटर नेमु द्या, अथवा रुग्णालयांवर कितीही बंधन टाकू द्या आर्थिक भुर्दंड हा पडतोच़ मग अशात जनतेने दाद मागावी तर कुणाकडे? कारण राजकारणी या मरणासन्न प्रसंगातही आपल्या राजकारणाची पोळी भाजण्यात व्यस्त आहे़ होय, हे कटु असले तरी सत्यच आहे़ आणि सत्याचा आवाज कधीही, कुणीही दाबू शकत नाही हे तितकेच खरे़़़!
देशात ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे त्यात महाराष्ट्र दुसºया-तिसºया क्रमांकावर आहे असे म्हणतात़ केंद्रात भाजपची सत्ता तर महाराष्ट्र राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची महाविकास आघाडी़ एकाविरूद्ध दुसरे असे वागत चाललेल्या राजकारणामुळे यात जनतेचा हकनाक बळी जात आहे़ सोशल मिडीयावर तर ‘कोरोना आणि राजकारणाचा’ हासा आणि जनतेचा रोष पहायला मिळत आहे़ ‘जिथे निवडणुका आहे, तिथे कोरोना जात नाही म्हणे’, ‘सरकार कुणाचीही असो आपण देशातच राहतो मग हा दुजाभाव का’? अशाही भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे़ राजकारणी शासनकर्ते ‘आपल्या सरकारचा नाकर्तेपणा’ लपविण्यासाठी नागरिकांवर संकटाची काळी छाया पांघरून त्यांच्याच माथी नाकर्तेपणा लादतात़ यात ‘पिसला व घासला’ जातो तो फक्त आणि फक्त सामान्य नागरिक़ ‘आमची सत्ता असती, तर असे केले असते, तसे केले असते म्हणणारे कित्येक गेले़ ज्याच्या मनात आहे तो काहीही करू शकते हेही जनतेला कळते़
कोरोनामुळे केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर चिखलफेक करण्यात व्यस्त आहे़ तो लसींचा विषय असो अथवा अनुदानाचा़ याहीपुढे एकाच बैठकीत बसणारे सत्ताधाºयासह विरोधी पक्षाचे राजकारणी ‘बैठकीत होकार तर बैठकीबाहेर नकार’ देतांनाही दिसून आले़ ये जनता सब देखती है़़़़़हे मात्र त्यांना कळायला हवे़ आपल्या जनतेचा हाच विसरभोळेपणा अशा नेत्यांना बळ देते़ निवडणुका आल्या की आपण सारेकाही विसरतो़ मतदान करणापुर्वी या सर्व विषयांचे ‘ आँडिट’ जर जनतेले केले तरच जनतेला खरा व सच्चा नेता मिळेल, नाही तर देशाचे काही खरे नाही असेच म्हणावे लागेल़ निवडणुकांपुर्वी ‘आम्ही हे केलं़,आम्ही ते केलं’ अशा वरचेवर थापा मारणारे लक्षात आले पाहीजे़ दुसरीकडे महाराष्ट्रावर सर्वांचे लक्ष केंद्रीत करून ‘आपला उल्लु सरळ’ करणाचीही शक्यता नाकारता येत नाही़ कारण देशात जर कोरोना आहे तर मग इतर राज्यात का नाही़ यातही राज्यातील सत्तेत विरोधी पक्ष आणि स्वपक्ष अशी भूमिकाही संशयास्पद आहे़
आज जनतेवर लाँकडाऊन लादल्या गेले़ याचा विरोधही मोठ्या प्रमाणात होतो आहे़ आजवर देशाच्या अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्थेला तुटपुंजा निधीच दिल्या गेला़ त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे केव्हाचेच खाजगीकरण झाले़ ‘ तहान लागल्यावर, विहीर खोदा’ अशी अवस्था आज कोरोनाने दाखवून दिली़ देशात लसीचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात करण्यात आला़ मात्र आज केंद्र सरकार राज्य सरकारला लस पुरवित नसल्याचेही आरोप-प्रत्यारोप सुरू आहे़ शासनकर्ते या न त्या कारणावरून संकटात असले तरी जनता आज ‘आपल्या माणसाला वाचविण्यासाठी’ रुग्णालयाबाहेर झटपटत आहे़ अनेकांच्या उद्योग धंद्यांला ब्रेक लागलेला आहे़ अनेकांच्या नौकºया गेल्या़ कोरोना काळात सहा महिने भरण्यात येत असलेल्या हफ्त्यांवर व्याज लागणार नाही असे म्हणत आज बँंका मोठ्या प्रमाणात जनतेकडून व्याज वसुल करीत आहे़ लाँकडाउन करायला जनतेचा विरोध नाही, फक्त निव्वळ लाँकडाउन करून जनतेला काहीही सहकार्य न करणे हे जिव्हाळी लागलेले आहे़ ‘कोरोनावर उपाय लाँकडाउन’ आता असेच म्हणावे लागेल़ कुठल्याच प्रकारे या वर्षभरात नागरिकांना दिलासा दिल्या गेला नाही़ ‘फक्त बंद करा’ असे म्हणत सरकार आपले हातपाय झटकतांनाच दिसून आले़ ‘आम्हाला जनतेची चिंता’ असे म्हणणारे इंधन दरवाढ रोखू शकले नाही़ घरगुती गँस सिलेंडरचे दर गगनाला भिडलेले आहे़ ‘४० रूपये’ सबसिडी नक्कीच न विसरता खात्यात जमा करते़ मात्र त्यामागे जनतेचे ‘रूपये ७६०’ जातात त्याचे काय़ या प्रश्नांची उत्तरेही कुणा राजकारण्याकडे नसतील़ कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केल्यामुळे लाखो युवा बेरोजगार झाले़ विचारधारेच्या गोष्टी हाकलणारे राजकारणी ‘सत्तेच्या खुर्चीसाठी’ इतरांच्या दारापुढे सतरंज्या पसरवून ‘भिक्षा’ मागतांनाही दिसून आले़ या सर्वांमुळे देश ‘खरंच महासत्तेकडे जात आहे का’? असाही प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित होत आहे़ कोरोना काळात सलाम आहे त्या लोकांना ज्यांनी निस्वार्थपणे जनतेची सेवा केली व काळाच्या पडद्याआडही गेले़ आरोग्य विभाग, पोलिस विभागासोबतच अनेकांनी आपल्या कार्यात काही कसूर ठेवलेली नाही़, आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीलेले आहे़
काहीतर आताही ‘लुटारू वृत्तीतच’ गुंतून आहे़ जनतेची ही अवस्था करणाºयांनो देश तुम्हाला माफ करणार नाही़

