मराठा समाजाचा अपमान करणा-यांवर गुन्हे दाखल करा – सकल मराठा समाज, नागपूर

239

अजय बिवडे, संपादक – विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेल्या मा. अनिल देशमुख यांच्याबद्दल बोलतांना मराठा जातीचा, मराठा समाजाचा उपहासात्मक उल्लेख करणे, देशमुखी संपली वगैर यासारखे शब्द उच्चारुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाºया अँड. जयश्री पाटील यांच्या वक्तव्याचा सकल मराठा समाज नागपूरतर्फे निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे़
मराठा आरक्षण प्रकरणापासूनच मराठा समाजाबद्दल अपमानजनक, उपहासात्मक वक्तव्य करणे हे खरोखरच डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानूसार योग्य नाही. अशा प्रवृत्तींवर कारवाई होणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने सक्करदरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाज नागपूर चे नरेन्द्र मोहिते, डॉ. विनय बाबर, छोटू (प्रविण) शिंदे, प्रा. प्रशांत भोसले, प्रविण माने, प्रा. नरेश तवले, राजेश निंबाळकर, सतीश शिंदे उपस्थित होते.